महापरीनिर्वाण दिनाला गालबोट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 December 2014

महापरीनिर्वाण दिनाला गालबोट

६ डिसेंबर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिवस.  या दिवशी बाबासाहेबांना त्यांच्या चैत्यभूमी या सरकामध्ये अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ६ डिसेंबरला २५ ते ३० लाख लोक भारताच्या कान्या कोपऱ्यातून येत असतात. दादरच्या शिवाजी पार्क चैत्यभूमी परिसरात या लाखो आंबेडकरी अनुयायांची गर्दी असते. आंबेडकरी अनुयायी शिस्तबद्ध पद्धतीने या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करून आलेल्या ठिकाणी परत जातात. 

या शिस्तबद्धतेला या वर्षी मात्र आंबेडकरी नेते आणि राजकीय पक्षांनी गालबोट लावले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या गर्दीचा फायदा उचलत गटा तटात विखुरलेले आंबेडकरी समाजातील स्वयंघोषित राष्ट्रीय नेते आपली हौस भागवण्यासाठी सभा घेत असतात. इतर वेळी सभा घेतल्यास यांच्या सभांना गर्दी होत नाही. म्हणून ६ डिसेंबरला असे नेते आपली हौस पूर्ण करून घेत असतात. शिवाजी पार्क वर जमलेला जन समुदाय जणू आपलेच भाषण ऐकायला आलेला आहे असा समाज करून भाषणे ठोकत असतात. 

असाच प्रकार या वर्षी घडला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर यांच्या सभा सुरु असताना दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने दुःखाच्या या दिवसाला गालबोट लागले. नेमके काय घडले आपसात भिडण्याचा प्रसंग का आला याची माहिती मिळवली असता आठवले आठवले गटामधली अस्वस्थता या प्रकाराला कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. 

शनिवारी ६ डिसेंबरला शिवाजी पार्क वर रिपाई आठवले गट आणि सेक्युलर गात यांच्या सभा बाजू बाजूला सुरु होत्या. सेक्युलरच्या स्टेज वरून काही रिपाई गट हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले आहेत. अश्या या गटांना आता हिंदुत्ववादी पक्षामध्ये विलीन करावे अशी टीका केली जात होती. हि टीका आठवले गटाला चांगलीच झोंबल्याने आठवले गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सेक्युलर गटाच्या स्टेजवर खुर्च्या भिरकावल्या, आणि स्टेज तोडण्याचा, सेक्युलरच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागले. 

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर या ठिकाणी वेगळे स्वरूप निर्माण झाले असते.  लाखो लोक या ठिकाणी उपस्थित असल्याने चेंगरा चेंगरी होऊन शेकडो लोकांचा प्राण गेला असता, कित्तेक लोक जखमी झाले असते. याचे भान या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेले नव्हते. आठवले गटा मध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. एकीकडे समजाच्या विरोधात जाऊन हिंदुत्ववादी संघटना बरोबर युती केली आहे दुसरीकडे न सत्ता मिळत आहे ना मंत्रिपदे मिळत आहेत. आठवले गटामध्ये काही लोकांना हिंदुत्ववादी संघटना बरोबर जाणे आवडलेलेही नाही. अश्या परिस्थिती मध्ये सापडलेल्या आठवले गटाकडून हा राग आता आंबेडकरी समाज आणि नेत्यांवर काढला जात आहे. 

आठवले गटाने चुकीचे निर्णय घेतले. या मध्ये स्वताची चूक असताना इतरांवर राग काढण्याची गरज नाही. जी काही नेत्यांनी निर्णय घेवून चूक केली आहे त्याची चर्चा आता होते आहे. आठवले गट जर हिंदुत्ववादी संघटनांच्या मागे फरफटत जात आहे असे बोलले जात आहे तर त्यात काय चुकीचे आहे. आज जी काही टीका होत आहे त्याला आठवले गट जबाबदार आहे. लोक जे सत्य आहे तेच बोलत आहेत. मारहाण करून लोकांची तोंडं बंद करता येणार नाहीत. सत्य हे नेहमी सत्यच राहणार आहे. म्हणून आता आठवले गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सत्य पचवायला शिकले पाहिजे. 

६ डिसेंबरला जो काही प्रकार आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे यामुळे आंबेडकरी समाजामध्ये आणखी संताप निर्माण झाला आहे याची नोंद पदाधिकार्यांनी घेतली पाहिजे. आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार आठवले गटाला आधीच सभे नढे काही होईल अशी भीती होती. आमच्या सभेमध्ये दगड फेक होईल, सभा उधळली जाईल, नेत्यांना मारहाण होईल अशी शक्यता पदाधिकार्यांनी पोलिसांकडे वर्तवली होती. आठवले गटामला आपल्याच समजातील लोक काहीही करू शकतात अशी भीती असल्याने जास्त पोलिस बंदोबस्त देण्याची मागणीही केली होती. 

याचाच अर्थ नेत्यांना त्यांचा समाज त्यांच्या बद्दल काय विचार करतो हे माहित आहे. असे असताना आठवले गटाला समाजाकडून आपल्याला किंमत दिली जात नाही हे माहित असताना शिवाजी पार्क वर लाखो आंबेडकरी अनुयायी असताना सभा घ्यायला नको होती. आपल्यावर जिकडे टीका होणार तिकडे जाण्यापासून आठवले गटाला टाळता आले असते. परंतू तरीही अश्या परिस्थिती मध्ये आठवले गटाने सभा घेतल्याने हा प्रकार घडला असे म्हणायला हरकत नाही. 

आठवले गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी आता या टीकेची सवय करुन घ्यायला हवी. आंबेडकरी पक्षाच्या गटांना समाजाच्या विरोधात जाऊन राजकारण करता येणार नाही. समजा पासून आपला गट खूप लांब गेला आहे. समाजातील लोक किंवा इतर लोक सत्य बोलत असतील तर त्यांना मारहाण करून हे सत्य लपवत येणार नाही याचे भान ठेवायलाच हवे. कोणा कोणाला आणि कधी पर्यंत मारहाण करून हे सत्य लपवता येईल याचा विचारही करायला हवा. एखाद्याने टीका केली तर त्याचे उत्तर टीकेने देता येत नसेल तर नसते उद्योग करून आपली आणि आपल्या गटाची इज्जत किती काढून घ्यायची याचाही विचार करायला हवा. 

६ डिसेंबरला आठवले गटाने जो काही प्रकार केला यामुळे महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागले आहे. यासाठी आंबेडकरी समाज आठवले गटाला कधीही माफ करणार नाही. आधीच आठवले गटाच्या निर्णयाला संतापलेला आंबेडकरी समाज आता आता आणखी संतापला आहे. 
आठवले गटाला आपले मानण्यास आंबेडकरी समाज आता तयार नाही. तशी चर्चा सध्या समाजात जोर धरू लागली आहे. या पुढे कधीही महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क मध्ये आंबेडकरी राजकीय पक्षांच्या सभा नको अशी मागणी केली जात आहे. कित्तेक संघटना सरकार आणि न्यायालयाकडे या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहेत. आठवले गटाच्या या राड्या मुळे शिवाजी पार्क वरील आंबेडकरी नेत्यांच्या सभा यापुढे मात्र होतील कि नाही याची शंका आहे. 

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad