पालिकेच्या बजेट मधील फक्त २४ टक्के रक्कम खर्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 December 2014

पालिकेच्या बजेट मधील फक्त २४ टक्के रक्कम खर्च

मुंबई / अजेयकुमार जाधव  
मुंबई महानगर पालिकेच्या सन २०१४ - २०१५ या वर्षाच्या ३१ हजार १७८ कोटीच्या बजेट पैकी पालिका प्रशासनाला डिसेंबर पर्यंत फक्त २४ टक्के रक्कमच खर्च करता आलेली आहे. पालिका प्रशासन बजेटचा पैसा मुंबईकर नागरिकांच्या सोय सुविधांसाठी खर्च करण्यात अपयशी ठरल्याने मुंबईकर नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला आहे. 

मुंबई महानगर पालिकेने सन २०१४ -१५ साठी ३१ हजार १७८हजार कोटीचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे.  अर्थ संकल्पातील मंजूर निधी पैकी गेल्या ९ महिन्यात पालिकेला २४ टक्केच निधी खर्च करता आला आहे. पालिकेच्या अर्थ संकल्पातील ६0 ते ६५ टक्क्य़ांपेक्षा जास्त निधी कर्मचारी-अधिकारी यांच्या वेतन भत्ते, बोनसवर आणि उर्वरित निधी हा भांडवली व इतर कामांवर खर्च होतो. पालिकेने यंदा ८ हजार १११ कोटींपेक्षा जास्त निधीची भांडवली खर्चासाठी तरतूद केली होती. त्यापैकी गेल्या ९ महिन्यांत केवळ १ हजार ९८0 कोटी रुपये इतका निधीच खर्च झाला, अशी माहिती आंबेरकर यांनी दिली. पालिकेच्या कामगार, चौकशी, मुख्य सुरक्षा अधिकारी, दुकाने व आस्थापना, डीपी, भाजेकर रुग्णालय, कस्तुरभा रुग्णालय, पालिका आयुक्त यांचे कार्यालय, मालमत्ता विभाग, पालिका सचिव, मुख्य लेखापाल, अभियांत्रिकी आणि विद्युतीकारण विभाग यांना गेल्या ९ महिन्यात एक रुपयाही खर्च करता आलेले नाही. 

भांडवली कामांसाठी झालेला खर्च : (लाखांत)विभाग       तरतूद  निधी  खर्च निधी  शिल्लक निधी 
रस्ते वाहतूक  २३0९१0.00  ८३८६0.0७  १४७0४९. ९३
पूल          ३३२८३.९0    ५९९३.८६   २७२९0. 0४
अग्निशमन    १९0५२.८४    २८९५. १0   १६१५७. ७४
मंडया          ४९३0.५    ३ ४२८.४५     ४५0२.0८
उद्याने         ३६१0८.६१   २७७७. 0७   ३३३३१. ५४
शिक्षण        २७४९४.९३  ३७६८. 0२    २३७२६. ८१
आरोग्य       २३२७४.८३   ११४८.५४    २२१२६. २९

Post Bottom Ad