मेट्रो-मोनो रेल्वे 'मरे'ला टाकतेय मागे ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2014

मेट्रो-मोनो रेल्वे 'मरे'ला टाकतेय मागे !

मुंबई ( जेपीएन न्यूज ): अनेक वर्षे मुंबईकरांच्या सेवेत असलेल्या मध्य रेल्वेच्या कमाईला अलीकडेच सेवेत दाखल झालेल्या मुंबई मेट्रो आणि मोनो रेल्वेमुळे उतरती कळा लागल्याची आकडेवारी पुढे आली आहे. उपनगरी मार्गावर मेन लाइन आणि हार्बर लाइनवर धावणार्‍या मरेच्या मासिक पासच्या मागणीत चालू आर्थिक वर्षात घट झाली आहे. २0१३च्या तुलनेत २0१४ मध्ये दरदिवशी ३0१८ मासिक पासची विक्री घटल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या वर्षी दरदिवशी ४४,९७१ मासिक पासची विक्री व्हायची. ते प्रमाण कमी होऊन यंदा दरदिवशी ४१,९५३ मासिक पासची विक्री होत आहे.
वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणारी मेट्रो, मोनोरेलचा चेंबूर ते वडाळा दरम्यानचा पहिला टप्पा, ईस्टर्न फ्री वेचा चेंबूरपासून घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडपर्यंत विस्तार या विकासकामांचा मध्य रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम होऊ लागला आहे. 'आमचे अनेक वर्षांपासूनचे प्रवासी तुटत चाललेत, ही चिंतेची बाब आहे. मुंबईकर प्रवासासाठी अन्य माध्यमांना पसंती देऊ लागले आहेत.मागील वर्षभरात मेट्रो, मोनो रेल्वे यांसारखे काही महत्त्वाचे परिवहन प्रकल्प जनतेसाठी खुले झाल्याने मध्य रेल्वेच्या मासिक पास विक्रीवर परिणाम झाल्याचे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. मध्य रेल्वेच्या मासिक पास विक्रीला उतरती कळा लागलेली असताना, पश्‍चिम रेल्वेची मासिक पास विक्री मात्र सुस्थितीत आहे. उलटपक्षी, पश्‍चिम रेल्वेच्या मासिक पास विक्रीत २0१३च्या तुलनेत १.८ टक्क्यांनी(अतिरिक्त ९,९१७ मासिक पास) वाढ झाली आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावर चालू वर्षात प्रत्येक दिवसाला ५0,५७३ मासिक पासची विक्री झाली. मध्य रेल्वेवर दैनंदिन तिकीट विक्रीत मात्र प्रगती दिसून आली आहे. या मार्गावर गेल्या वर्षी दरदिवशी ७.९ लाख तिकिटांची विक्री झाली. त्यात चालू वर्षी ४४,६९६ तिकिटांची विक्री वाढली म्हणजेच दर दिवसाला ८.४ लाख तिकिटांची विक्री होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Post Bottom Ad