महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेल्या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा – महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2014

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेल्या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा – महापौर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱया लाखो अनुयायांना बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुरविण्यात आल्या असून या सेवा-सुविधांचा आंबेडकरी अनुयायांनी लाभ घेऊन महापालिकेला सहकार्य करावे असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.

बृहन्मुंबई महापालिकेतर्फेदेण्यात आलेल्या सेवा-सुविधांबाबत जनसंपर्क विभागानेसंकलित केलेल्या सचित्र माहिती पुस्तिकेचेप्रकाशन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते शिवाजी पार्क मैदानावरील महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील स्वागत कक्षात आज (दिनांक ०५ डिसेंबर, २०१४) सकाळी करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

महापौर आंबेकर पुढेबोलताना म्हणाल्या की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येनेयेणाऱया अनुयायांसाठी महापालिकेने पाणी, आरोग्य, ‘बेस्ट’ ची सुविधा अधिकाअधिक व चांगल्याप्रकारे देण्याचा प्रयत्न केला आहे. या सेवा-सुविधांचा उपस्थित अनुयायांनी लाभ घेऊन याठिकाणी वितरीत करण्यात आलेली माहिती पुस्तिका व त्यातील दुर्मिळ छायाचित्रे आपल्या गावी गेल्यानंतरही अनुयायांनी संग्रही ठेवावी इतकी ती दर्जेदार असल्याचेत्यांनी यावेळी सांगितले.

बाहेरगावांवरुन आलेलेअनुयायी वाट चुकलेअसतील तर तसेच कोणी हरविलेअसेल तर त्यांना परत आपल्या मूळ ठिकाणी येऊन एकत्रित होता यावेयासाठी यावर्षी प्रथमच आकाशात मार्गदर्शक बलून सोडण्याचा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी आलेल्या अनुयायांनी पाण्याचा योग्य तो वापर करावा. तसेच शांत व संयमानेशिस्तीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन चैत्यभूमीचेपावित्र्य राखावे, असेप्रतिपादनही महापौरांनी शेवटी केले.

उप महापौर अलका केरकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत असून महापालिकेतर्फे पुरविण्यात आलेल्या सेवा-सुविधांचा तसेच वितरीत करण्यात येणाऱया माहिती पुस्तिकेचा अनुयायांनी लाभ घ्यावा, असेत्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेलेस्वच्छता अभियान उपस्थित अनुयायांनी आपल्या गावात सुद्धा राबवावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले .

महापालिका आयुक्त सीताराम कुंटेयावेळी मार्गदर्शन करताना म्हणालेकी, बृहन्मुंबई महापालिकेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथेआवश्यक ती व्यवस्था केली आहे. अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नयेतसेच दर्शन सुलभ व्हावे यासाठी पोलिसांच्या मदतीने अत्यंत चोख व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी प्रथमच शासनाच्या वतीनेमानवंदना तसेच हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचेत्यांनी सांगितले. यापुढेही सुविधांमध्येअधिकाअधिक सुधारणा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार असल्याचेत्यांनी सांगितले. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानातर्गत स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन यावर्षीची माहिती पुस्तिका ही स्वच्छता विषयाची थीम घेऊन तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षीच्या या माहिती पुस्तिकेत महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर : सामाजिक स्वच्छतेचे प्रणेते ! या विषयावर लेखाद्वारे प्रकाश टाकला आहे. सर्वप्रथम बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले.त्यानंतर महापौर श्रीम. स्नेहल आंबेकर यांच्या हस्तेमाहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बाहेरगावाहून आलेल्या अनुयायांना प्राथमिक स्वरुपात माहिती पुस्तिकेचेवितरण मान्यवरांच्या हस्तेयावेळी करण्यात आले. त्यानंतर यावर्षी प्रथमच ‘नागरी सेवा सुविधांविषयक’ प्रदर्शन आयोजित करण्यात आलेअसून या प्रदर्शनाचेउद्घाटनही महापौरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी सभागृह नेते श्रीम. तृष्णा विश्वासराव, बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष अनिल सिंह, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष दीपकबाबा हांडे, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा पूजा महाडेश्वर, माजी महापौर महादेव देवळे, नगरसेवक श्रीकांत कवठणकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर)  विकास खारगे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, उप आयुक्त (परिमंडळ -२) आनंद वागराळकर, ‘जी/उत्तर’ विभागाचेसहाय्यक आयुक्त शरद उघडे, हे मान्यवर उपस्थित होते.
Displaying BMC_8372.JPG
Displaying BMC_8422.JPG
Displaying BMC_8578.JPG
Displaying DSC_0739.JPG
Displaying DSC_0710.JPG

Post Bottom Ad