हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावावर विचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 December 2014

हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावावर विचार

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : हार्बर मार्गावरील प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू असून मागील काही आठवडे सरकारी यंत्रणांची लगबग सुरू आहे. रेल्वे प्रशासन, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन तसेच विविध वाहतुकीशी संबंधित असलेल्या सरकारी संस्थांच्या या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी मॅरेथॉन बैठकींचे सत्र सुरू आहे. या बैठकांमधील चर्चेनंतर दोन पर्याय समोर आले आहेत. 
हार्बर मार्गावर दररोज १0 लाख प्रवासी प्रवास करतात. या मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून यावर उपाय म्हणून हार्बर मार्गाचे विस्तारीकरण करण्याची योजना आखण्यात आली आहे. शिवडी, रे रोड, कर्नाक बंदर, इंदिरा डॉक आणि बॅलार्ड पिअर या ठिकाणी नवीन स्थानके प्रस्तावित आहेत. वडाळा स्थानकातील १ आणि ४ क्रमांकांचे फलाट अंधेरीच्या दिशेने जाणार्‍या प्रवाशांच्या वाहतूक कोंडीचा भार पेलण्यास सक्षम आहेत, असे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच २ आणि ३ क्रमांकाच्या फलाटामुळे पनवेलच्या दिशेने होणार्‍या वाहतुकीचा भार हलका होतो. ईस्टर्न फ्री वे आणि पी. डिमेलो रोड येथून हा प्रस्तावित मार्ग जाणार आहे. तेथून तो इंदिरा डॉकजवळून जाईल आणि बॅलार्ड इस्टेटला जोडला जाणार आहे. दोन वर्षांत हा ९ किमीचा मार्ग पूर्ण होईल, असे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.

पर्याय १ : बॅलार्ड इस्टेट, वडाळा, वांद्रे, अंधेरी 
सीएसटी, वडाळा, कुर्ला, पनवेल हा पर्याय अमलात आल्यास अंधेरीहून जाणार्‍या हार्बर मार्गाला बॅलार्ड इस्टेटपासून सुरुवात होईल, तर नवी मुंबईच्या दिशेला जाणारा मार्ग छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून सुरू होईल आणि पुढे पनवेलपर्यंत जाईल. हे दोन्ही मार्ग वडाळा येथे जोडले जातील.

पर्याय २ : बॅलार्ड इस्टेट, वडाळा, वांद्रे, अंधेरीबॅलार्ड इस्टेट, डॉकयार्ड रोड, वडाळा, कुर्ला, पनवेल या पर्यायानुसार बॅलार्ड इस्टेट हे हार्बर मार्गावरील अंतिम स्थानक असेल. या मार्गावरून वडाळामार्गे अंधेरीपर्यंत तसेच वडाळा आणि डॉकयार्ड रोडमार्गे पनवेलकडे प्रवास करता येईल.

Post Bottom Ad