मुंबई-मडगावदरम्यान ६ स्पेशल ट्रेन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2014

मुंबई-मडगावदरम्यान ६ स्पेशल ट्रेन

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान रेल्वे मंत्रालयाने ६ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे.

00११0 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव स्पेशल ट्रेन २0, २७ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजून १0 मिनिटांनी सुटणार असून, मडगावला दुसर्‍या दिवशी दुपारी १२ वाजून २0 मिनिटांनी पोहोचणार आहे, तर परतीच्या प्रवासासाठी 00११२ मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल ट्रेन १९, २६ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून ३0 मिनिटांनी सुटणार असून, त्याच दिवशी रात्री १२ वाजून २0 मिनिटांनी पोहोचणार आहे. या स्पेशल ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम आणि करमाली या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या स्पेशल ट्रेनला एसी टु टायरचे ३ कोच, एसी थ्री टायरचे ४ कोच, स्लीपर क्लासचे ३ कोच असणार आहेत. प्रवासी या स्पेशल ट्रेनचे आरक्षण १३ डिसेंबरपासून करू शकतात.

Post Bottom Ad