परेवर एटीव्हीएमची संख्या झाली ४५0 - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2014

परेवर एटीव्हीएमची संख्या झाली ४५0

मुंबई ( जेपीएन न्यूज ) 
उपनगरी प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्यांवर रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने अँटोमॅटिक तिकीट वेण्डिंग मशीन (एटीव्हीएम) रेल्वे स्थानकांवर लावले आहेत. या मशिन्सवर स्मार्टकार्डच्या आधारे प्रवासी आपले तिकीट स्वत: काढू शकतो. पश्‍चिम रेल्वे मार्गावर एटीव्हीएमची संख्या आता ४५0च्या घरात गेली आहे. त्यामुळे तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांच्या रांगा कमी झाल्या आहेत.

पश्‍चिम रेल्वे मार्गावर गर्दीच्या वेळेस प्रवाशांना तिकिटासाठी तिकीट खिडक्यांवर उभे राहावे लागू नये यासाठी ३00 एटीव्हीएम मशीन चर्चगेट ते डहाणू रोड स्थानकांदरम्यान बसवण्यात आल्या आहेत. या एटीव्हीएममुळे प्रवाशांची आणि तिकीट खिडक्यांवर कार्यरत असणार्‍या बुकिंग क्लार्कची तू तू मै मै कमी झाली असून प्रवाशांचा वेळदेखील वाचत आहे. पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने १५७ नवीन एटीव्हीएम मशिन्स लावण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे परेवर आता एकूण एटीव्हीएम मशिन्सची संख्या ४५७ झाली आहे. एटीव्हीएम मशिन्सच्या आधारे प्रवासी फस्र्ट क्लास, सेकंड क्लासचे सिंगल, रिटर्न तिकीट आणि मासिक पासचे नूतनीकरण करू शकतो. आजच्या घडीला परेवर दररोज ४५ हजार प्रवासी हे एटीव्हीएमच्या आधारे आपल्या मासिक पासाचे नूतनीकरण करतात, तसेच ५ टक्के प्रवासी रोज तिकीट काढण्यासाठी एटीव्हीएमचा वापर करतात.

Post Bottom Ad