मुंबई : मुंबई महापालिकेच्या फेरीवाला धोरणात महिला बचत गटांना १0 टक्के आरक्षण देण्यास पालिकेने 'ठेंगा' दाखवला आहे. भाजपाच्या नगरसेविका मनीषा चौधरी यांच्या ठरावाच्या सूचनेवर महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी नकारात्मक अभिप्राय दिला.
'इतरांना नियमानुसार आरक्षण दिले असल्याचे सांगत आयुक्तांनी महिला बचत गटांना फेरीवाला धोरणात सामावून घेण्याचे दरवाजे बंद केले आहेत. फेरीवाला धोरणात महिला बचत गटांना १0 टक्के आरक्षण देण्याची ठरावाची सूचना चौधरी यांनी मांडली होती. ती संमत झाल्यानंतर आयुक्तांकडे अभिप्रायासाठी गेली असता, ' महिला बचत गटांचा उल्लेख टाळून या बचत गटांना आरक्षण देण्यास नकार दिला आहे. महापालिका अधिनियम २0१४च्या कलम सात अन्वये फेरीवाल्यांची नोंदणी करताना अनुसूचित जाती आणि जमाती, इतर मागासवर्ग, महिला, निराधार आणि अल्पसंख्याकांनाच आरक्षण देण्याची तरतूद आहे, असा अभिप्राय देत आयुक्तांनी महिला बचत गटांना फेरीवाला धोरणात सामावून घेण्यास नकारघंटा वाजवली.