वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गिकेचे उद््घाटन होऊन १८0 दिवस पूर्ण झाले आहे. या काळात ५0 लाख प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केल्याचे दिसून आले आहे. जगातील इतर मेट्रोच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पूर्व व पश्चिम उपगनराला जोडणार्या मेट्रोतील प्रवाशांची संख्या सुरुवातीलाच नवनवीन जागतिक विक्रम करत असल्याचे दिसून आले होते. लहान मुलांसाठी मोफत प्रवास, सकाळच्या वेळेत तिकिटांचा कमी दर, मेट्रो, सुरक्षेच्या नव्या संकल्पना अशा नामी युक्त्या लढवत मेट्रोने सर्वसमान्यांना मेट्रो प्रवासाची भुरळ घातली गेली. काही महिन्यांमध्ये मेट्रोचा प्रवास हा सर्वसामान्यांसाठी आवश्यक बनून गेला असून, प्राधान्याने मेट्रोचा वापर करणार्यांची संख्या वाढली आहे. ७0 हजार फेर्या आणि ५0 लाख प्रवासी हा वेग महत्त्वाचा ठरत असून आणखी नवे रेकॉर्ड नोंदविण्याची अपेक्षा आहे. काही तांत्रिक अपवाद वगळता ९९ टक्के सुलभ सेवा आणि परवडणारे दर यांचा समतोल राखण्यात आला आहे. गेल्या ६ महिन्यांत ५0 लाख प्रवासी हे यश असून, जागतिक दर्जाचा विक्रम असल्याचे सांगण्यात आले आहे. मेट्रो सेवा जागतिक दर्जाच्या सेवा पुरवत असून, नवनवीन अद्ययावत प्रणालीचा वापर हा सर्वसमान्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.