मुंबई : डेंग्यूने मुंबईत घातलेले थैमान थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. आतापर्यंत डेंग्यूचा बळी ठरणार्या मुंबईकरांची संख्या १५व्या वर गेली आहे. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यांमध्ये डेंग्यूचे ८१ नवे रुग्ण आढळून आले आहे. तसेच तापाच्या रुग्णांची संख्या ही ४८00 पर्यंत वाढली आहे. यावरून पालिकेने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे परिणाम दिसून येत नसल्याचे समजते.
नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी अद्यापही तापमान घटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. त्यातच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे अवेळी पडलेल्या पावसामुळे वातावरणातील उष्मा वाढला होता. त्यामुळे डेंग्यूच्या डासाच्या अळ्यांना पोषक असे वातावरण आहे. कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेत बुधवारी कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३५ व २५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. थंडीची लाट आल्यानंतर वातावरणातील उष्मा कमी होऊन त्याचा परिणाम डेंग्यूच्या अळ्यावर होईल, असा कयास वर्तविण्यात येत आहे. मात्र मुंबईत थंडीची लाट विलंबाने येण्याची चिन्हे दिसत असताना, डेंग्यू आणि इतर साथीच्या आजाराने बळावलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

पालिकेकडून डेंग्यूमुळे मृत्यू होणार्या रुग्णांची आकडेवारी उघडपणे सांगितली जात नाही आहे. पालिकेच्या रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयतील रुग्णांची आकडेवारीचे संकलन करणे कठीण आहे. केईएम रुग्णालयात उपचार घेणार्या डॉक्टरच डेंग्यूचे बळी ठरले आहे. डेंग्यूमुळे बुधवारी तीन जणांचा बळी गेला.नोव्हेंबरच्या पहिल्या दोन सप्ताहात डेंग्यूचे ८१ रुग्ण दाखल झाले असून, तापाचे ४ हजार ८00 रुग्ण आढळले आहेत. मलेरियाचे ४४८ रुग्ण उपचार घेत आहेत, तर गॅस्ट्रोचे एकूण ३७५ रुग्ण व टायफॉईडचे ६२ रुग्ण दाखल झाले आहेत. ऑक्टोबर २0१४ मध्ये डेंग्यूचे २१३ रुग्ण आढळले होते, तर तापाचे गेल्या महिन्यात १३ हजार २१४ रुग्ण आणि मलेरियाचे एक हजार चार रुग्ण आढळले होते.
नोव्हेंबरमधील आकडेवारी
ताप ४८00
मलेरिया ४४८
डेंग्यू ४0
गॅस्ट्रो ३७५
टायफाईड ६२
हेपिटायटिस ४८
गॅस्ट्रो ३७५
टायफाईड ६२
हेपिटायटिस ४८