मुंबई : सरकारी खात्यांतील लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता नवे तंत्र विचारात घेतले आहे. लाचखोरीच्या माध्यमातून कमावलेल्या बक्कळ पैशांचा फायदा घेणार्या त्यांच्या कुटुंबीयांविरोधातही गुन्हे दाखल करण्याचा निर्णय एसीबीने घेतला आहे. या नव्या तंत्राने सरकारी खात्यांना लागलेली लाचखोरीची कीड दूर होईल, असा विश्वास एसीबीला वाटत आहे.
यापूर्वी हे तंत्र बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अवलंबण्यात आले होते. सध्या या तंत्राचा लाचखोरीच्या कारवाईदरम्यान वापर केला जात असल्याचे एसीबीतील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. जर रक्कम ज्ञात आर्थिक उत्पन्नाची र्मयादा ओलांडणारी असेल, तर त्या प्रकरणात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करत आहोत. जर त्याचवेळी लाचखोरीच्या पैशाचे लाभार्थी सरकारी बाबूचे कुटुंबीय असल्याचे उघड झाले, तर त्यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा नवा गुन्हा दाखल केला जातो, असेही संबंधित अधिकार्याने स्पष्ट केले. लाचखोरीच्या प्रकरणात यशस्वी सापळा रचल्यानंतर बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करणे ही यापूर्वी सामान्य बाब नव्हती; पण आता वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अशी कठोर पावले उचलावी लागल्याचे एसीबी अधिकार्यांनी सांगितले. एसीबीने एप्रिल २0१३ पासून अशा प्रकारच्या २0 हून अधिक गुन्ह्यांची नोंद केली आहे. एका प्रकरणात अंधेरी आरटीओतील सहाय्यक आरटीओ अधिकारी राजेंद्र नेरकर व त्याच्या साथीदाराला बस ालकाकडून १५00 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एप्रिलमध्ये अटक झाली होती. त्या वेळी नेरकरच्या घरात धाडसत्र राबवल्यानंतर तब्बल ८४ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. पुढील तपासादरम्यान तर नेरकर व त्याच्या पत्नीच्या नावे १.१६ कोटींची मालमत्ता असल्याचे उघड झाले. त्यापैकी ९९.९२ लाख रुपये 'बेहिशेबी' होते. लाच घेण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एसीबी अधिकार्यांनी नेरकरच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल केला होता.