अहमदनर जिल्ह्यातील जवखेडे इथल्या जाधव कुटुंबियांच्या हत्याकांड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. या भेटीत राज यांनी जवखेडे दलित हत्याकांडाची चौकशी वेगाने करण्याची मागणी केली. तसंच या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या दिरंगाईचा मुद्दाही उपस्थित केला.
'अशा प्रकरणांमध्ये पोलिस कारवाई करण्यात चालढकल करतात. कारण नंतर त्यांच्यावरही अॅक्शन घेतली जाते. त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे, असं आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं', असं राज म्हणाले. 'तपासात दिरंगाई होऊ देणार नाही, सर्व शक्यता तपासल्या जात आहेत', असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं राज यांनी सांगितलं.
यासह आपण आणखी तीन विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ऊस दराचा प्रश्न सरकारने लवकर सोडवावा. नाशिकमध्ये अनेक महिने झाले महापालिकेला आयुक्त नाहीत. राज्य सरकारने लवकरात लवकर तिथे आयुक्तांची नियुक्ती करावी, अशा मागण्या राज यांनी केल्या.