महिला स्वच्छतागृहांच्या विषयाला प्राधान्य द्यावे - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2014

महिला स्वच्छतागृहांच्या विषयाला प्राधान्य द्यावे - महापौर

मुंबई : महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा मुद्दा मुंबईत दिवसेंदिवस जास्त जटील ठरत असल्यामुळे तो मार्गी लावण्यासाठी आपण वैयक्तिक प्राधान्य देत आहे. पालिका प्रशासनानेही त्याला प्राधान्य देऊन हा जटील प्रश्न सोडवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले आहे. 

जागतिक शौचालय दिनानिमित्त महापालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात आयोजित केलेल्या एका विशेष परिसंवादात त्या बोलत होत्या. मुंबईतील स्वच्छतागृहांची व्यवस्था अधिकाधिक परिपूर्ण होण्यासाठी एका वैशिष्ट्यपूर्ण चतु:सूत्रीची मांडणी केली होती, असे आयुक्त म्हणाले. 'राईट टू पी' अभियानामुळे महिलांसाठीच्या स्वतंत्र स्वच्छतागृहांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे, असे सांगून आयुक्तांनी मुंबईसारख्या महानगरात स्वच्छतागृहांची व्यवस्था परिपूर्ण असावी व त्यांची व्यवस्था चांगली असावी, यासाठी महापालिका सदैव कटिबद्ध असल्याचे कुंटे यांनी सांगितले.

Post Bottom Ad