कॅमेरामनवर भूमाफियांचा प्राणघातक हल्ला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 November 2014

कॅमेरामनवर भूमाफियांचा प्राणघातक हल्ला

मुंबई / रशिद इनामदार वृत्त वाहिन्यांसाठी काम करणाऱ्या मुक्त कॅमेरामन बाबू शेख यांच्यावर भूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला . २० तारखेला रात्री १०:३० च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बाबू गंभीर रित्या जखमी झाले आहेत.आपल्या पत्रकार मित्रांना भेटून चिता कॉम्प येथील  घरी ते परतत असताना हा हल्ला झाला . 

चिता कॉम्प  येथील वनक्षेत्रात बांधण्यात आलेल्या बांधकामांना पडण्याची कारवाई वन विभागाकडून करण्यात आली . तेंव्हा त्या कारवाईचे चित्रीकरण बाबू शेख आपल्या क्यामेरयाने  करत होते . त्यामुळे ही काही कारवाई बाबू शेख यांनी दिलेल्या माहितीवरून करण्यात आल्याचा संशय मोइन व आरिफ या भूमाफियाना आला . त्या सुडापोटी त्यांनी बाबू शेख यांच्यावर हल्ल्याचा कट रचला .मानखुर्द पी एम जी पी येथून आपले शहर या साप्ताहिकाचे संपादक त्रिभुवन दाठीया यांना व इतर पत्रकार मित्रांना भेटून परतत असताना रिक्षा व मोटार सायकल ने त्यांचा पाठलाग करण्यात आला . चित कोम्प पायलीपाडा येथील क्रिसेण्ट शाळेच्या मैदानासमोरील रस्त्यावर त्यांना अडवण्यात आले. 


यावेळी रिक्षात बसलेल्या ५ तसेच मोटार सायकल वर बसलेल्या मोइन व आरिफ या भूमियानी त्यांच्यावर हल्ला केला . त्यांना लोखंडी सळई तसेच लाथ बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली . त्यांनी मदत मिळवण्यासाठी संपर्क साधता यावा म्हणून मोबाइल फोन काढला. हल्लेखोरांनी तो हिसकावून घेतला व पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली .त्यांना बळजबरीने रिक्षात बसवून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला . जीव वाचवण्यासाठी त्यांनी पायलीपाडा येथील जनादेश वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश पाटील यांच्या घराकडे धाव घेतली .  गोंधळ ऐकून सुरेश पाटील यांचे भाऊ बाहेर आले व त्यांनी हल्लेखोरांना रोखले . आजूबाजूचे रहिवाशी जमायला लागल्याचे पाहून हल्लेखोरांनी तिथून पळ  काढला . 

बाबू शेख जबर मारामुळे बेशुद्ध झाले तेंव्हा त्यांना नीट एका बाजूला बसवून . सुरेश पाटील यांनी बाबू शेख यांचे कुटुंबीय तसेच पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली . त्यानंतर पोलिसाच्या वाहनातून बाबू शेख यांना कुटुंबीयांच्या मदतीने सुरेश पाटील यांनी गोवंडीच्या मदन मोहन मालवीय रुग्णालयात आणले . प्राथमिक तपासणी झाल्यानंतर त्यांना सिटी स्कॅन तसेच एक्स रे साठी लोकमान्य टिळक रुग्णालय शिव येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला . लोकमान्य टिळक रुग्णालयाकडे नेत असताना त्यांची प्रकृती जास्त अस्वस्थ होऊ लागल्यामुळे त्यांना चेंबूर येथील हेगडे रुग्णालयात दाखल करण्यात आले . रात्री उशिरा trombay पोलिस ठाण्याचे व. पो.नि अन्सार पिरजादे यांनी स्वतः येउन बाबू शेख यांची विचारपूस केली . पोलिसांना तत्काळ हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले . 

पोलिस निरीक्षक गावढे व पोलिस उपनिरीक्षक तोरस्कर यानी बाबू शेख शुद्धीवर आल्यानंतर जबानी घेतली . दरम्यान पोलिसांनी चार हल्लेखोरांना पंडित मदन  मोहन मालवीय रुग्णालयाच्या आवारातून ताब्यात घेतले आहे . रुग्णालयाबाहेर ज्येष्ठ पत्रकार व आले शहर चे संपादक त्रिभुवन दाठीया , मुंबई प्लस चे संपादक फारूक मेवाडी तसेच सर्व वृत्तवाहिन्यांचे , वर्तमानपत्रांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यांनी बाबू शेख यांची भेट घेतली व या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.  त्रिभुवन दाठीया यावेळी म्हणाले कि या प्रकरणातील आरोपी लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही वरिष्ठ पोलिस निरीक्षक , आयुक्त , सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले 

Post Bottom Ad