मुंबई : मुंबईकरांच्या जीवाची काळजी घेण्याची प्राथमिक जबाबदारी असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाने लोकांमध्ये आरोग्य, विविध रोग, वैद्यकीय सुविधा आदींबद्दल जनजागृती शिबिरे घेतली तरच लोकांमध्ये जागृती होईल आणि ते आरोग्याबद्दल सजगही होतील, अशी अपेक्षा असताना आरोग्य विभागाने या वर्षी जून ते ऑक्टोबरपर्यंत अवघी ३0 ते ३५ आरोग्य शिबिरे घेतल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १00 हून अधिक शिबिरे घेऊन आरोग्य विभागाने जागृती केल्यामुळे विविध आजारांचा जास्त प्रादुर्भाव झाला नव्हता.
पालिकेच्या २४ विभागांमध्ये आरोग्य विभाग पावसाळ्याआधी लोकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून त्यांच्यात जागृती निर्माण करते, जेणेकरून ते विविध रोगांबद्दल सजग होऊन स्वत: काळजी घेतात. गेल्या वर्षी जून ते सर्व विभागांमध्ये मिळून १00 पेक्षा जास्त शिबिरे घेण्यात आली पण या वर्षी फक्त ३0 ते ३५ शिबिरेच घेण्यात आली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळे डेंग्यू, मलेरिया, डेंग्यूच्या २0१0 ते १३ पर्यंत तीन हजार ८६ 'केसेस' दाखल झाल्या असून, २९ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 'केसेस' २0१२ मध्ये एक हजार ८ दाखल झाल्या असून, सर्वाधिक मृत्यू २0१३ मध्ये नोंदवले गेले. गेल्या वर्षी ११ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू ओढवला.गॅस्ट्रो, टायफॉईड आणि कावळीच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.
अशी होते कायदेशीर कारवाई..
डेंग्यू आणि हिवताप पसरवणार्या डासांची उत्पत्ती आढळल्यास पालिका अधिनियम १८८८ कलम ३८१ अ व ब अन्वये कायदेशीर कारवाई केली जाते. या कारवाईच्या आधी रहिवाशांना प्रथम नोटीस दिली जाते. त्यानंतर महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल केला जातो. न्यायालयातून गुन्हेगारांना समन्स काढले जाते. गुन्हेगार न्यायालयात हजर न झाल्यास त्याला दंड आकारणी होते किंवा गुन्हेगार त्याची बाजू न्यायालयात मांडू शकतो वा न्यायालयाचा दावा लढवू शकतो. समन्स मिळाल्यानंतरही गुन्हेगार न्यायालयात हजर झाला नाही तर त्याच्याविरोधात वॉरंट काढण्यात येते व पोलिसांच्या मदतीने त्याला न्यायालयात हजर करण्यात येते. २0१४ मध्ये ऑक्टोबरपर्यंत १३ हजार २१५ ठिकाणी कारवाई केली जाते.

वर्ष केसेस मृत्यू
२0१0 ११५ 0३
२0११ ४१६ 0३
२0१२ १00८ 0५
२0१३ ९२७ ११
२६ ऑक्टो १४ पर्यंत :
२0१0 ११५ 0३
२0११ ४१६ 0३
२0१२ १00८ 0५
२0१३ ९२७ ११
२६ ऑक्टो १४ पर्यंत :
६२0 0७
एकूण : ३0८६ २९
एकूण : ३0८६ २९
डेंग्यूच्या २0१0 ते १३ पर्यंत तीन हजार ८६ 'केसेस', २९ मृत्यू