राष्ट्रवादी, कॉंग्रेससह भाजपाने केला सभात्याग - शिवसेना एकाकी
मुंबई (प्रतिनिधी)- शहरात वाढलेल्या डेंग्यूचे पडसाद बुधवारी पालिकेत उमटले. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासन अपयशी ठरले असताना सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण केली गेली. त्यातच डेंग्यू साथीचा आजार असल्याचे विधान महापौरांनी केले याच्या निषेध करीत कॉंग्रेसचे गटनेते देवेंद्र आंबेकर यांनी सभात्यागाची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी, कॉंग्रेससह भाजपाने सभागृहातून निघून केल्याने शिवसेना एकाकी पडल्याचे दिसून आले.
आज स्थायी समितीत मुंबईतील वाढत्या डेंग्यूच्या रोगाबाबत सर्व विरोधकांनी पालिकेच्या आरोग्य विभागाबरोबरच आयुक्त आणि सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट केले. प्रामुख्याने यामध्ये सत्ताधारी पक्षाचा भाग असणाऱ्या भाजपानेही विरोधकांच्या सुरात सूर मिसळून शिवसेनेला कोंडीत पकण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी गटनेते धनंजय पिसाळ यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे बोलताना गेले दोनतीन महिने मुंबईत डेंग्यूचे थैमान असताना प्रसाशन गंभीर नाही. तसेच महापौरांनी या रोगाबाबत डे वक्तव्य केले. हे चूकीचे असून हा जनतेचा अपमान असल्याचे सांगत त्यांनी महापौरांचा निषेध केला. पिसाळांच्या हरकतीच्या मुद्द्यावर सर्व सदस्यांनी पाठिंबा व्यक्त करताना या सर्वच आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप केला. पोष्टर लावून मच्छर जाणार का असा सवाल विचारत कोटक यांनी प्रशासनाला धारेवर धरले. तर, प्रशासनाने दिलेल्या चूकीच्या माहीतीमुळे महापौरांनी विधान केले, त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले. फवारणी औषधांच्या तेलामध्ये घोटाळा झाल्याचे सांगून याला प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप केला. तर, आठ दिवस फवारणी औषध नसल्याने डेंग्यूमध्ये वाढ झाली. नाले, गटारांची सफाई न झाल्याने डेंग्यूत वाढ होत असल्याचे मुद्दे निदर्शनात आणून देत याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावेळी प्रशासनाला धारेवर धरल्याने सत्ताधारी पक्षांने प्रशासनाची पाठराखण केली. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी भाजपानेही विरोधकांबरोबर गेल्याने शिवसेना एकाकी पडली.
डेंग्यू रुग्णांच्या संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. जूनपासून जनजागृतीवर भर दिला आहे. तसेच हेल्प कॅंपही राबविले आहेत. पंरतु, घराघरात जाऊन फवारणी करणे शक्य नाही. मागील महिन्यात ४८ टक्के डेंग्यू घरात अळ्या सापडल्या. तर यात वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यात तब्बल ९२ टक्के घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या असल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त संजय देशमूख यांनी दिले. तसेच दिवसाला ६० ते ७० टक्के घरांची पहाणी करीत असून नागरिकांना सहकार्य करण्यास बजावत असल्याचे ते म्हणाले. डेंग्यू रोखण्यास पूर्णपणे यंत्रणा कामाला लागली असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
जरा एकून तर घ्या
महापौरांनी रुग्णालयांना दिलेल्या भेटी दरम्यान, रुग्णांच्या मनात डेंग्यूची भीती पसरली होती. त्यांची समजूत घालण्यासाठी महापौरांनी डेंग्यू साथीचा आजार असल्याचे विधान केल्याचा खुलासा सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केला. डेंग्यू हा गंभीर आजार असून त्यावर उपचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी झोपडपट्टी विभागात डेंग्यूचे प्रमाण कमी त्या म्हणाल्या. मात्र, उत्तर सत्ताधारी पक्षांची बाजू एकून घ्या असे सांगण्यासाठी विरोधकांनी जरा एकून तर घ्या असे विनवनी केली. मात्र, भाजपासह विरोधकांनी खुलासा न ऐकताच सभात्याग केला.