मुंबई : बिहार आणि उत्तर प्रदेशातून येणार्या लोंढय़ाविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारणार्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपला मोर्चा गुजराती आणि जैन समुदायांविरोधात वळवला आहे. मुंबईतील काही बांधकाम व्यावसायिक जात, धर्म आणि मांसाहार करणार्या लोकांना घरांची विक्री करत नसल्याच्या तक्रारीचे पत्र मनसेने मुंबई महानगरपालिकेच्या सविचांना दिले आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनीही गुजराती भाषिकांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर आता मनसेही आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
मनसेच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात नोटीस ऑफ मोशन मूव्ह करून जातीभेद करणार्या अशा बांधकाम व्यावसायिकांना कमेन्समेंट सर्टिफिकेट देऊ नये, अशी मागणी मुंबई महानगर पालिकेच्या सचिवांना दिलेल्या पत्रात केली आहे. मुंबईतील काही बांधकाम व्यावसायिक जात, धर्म आणि मांसाहार करणार्यांना सदनिकांची विक्री करत नाहीत किंवा त्यांना भाड्याने घरे न देत नाहीत. ज्यांना अशा प्रकारे घरांची विक्री केली नाही त्यामध्ये ९९ टक्के मराठी व्यक्तींचा समावेश होता. त्यामुळे कायद्यात बदल करत बांधकाम व्यावसायिकांनी फ्लॅट्सची विक्री करताना जाती, पंथाचा भेदभाव करू नये, आणि असे करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद करावी, अशी मागणी देखील पत्रात केली आहे. असे असले तरी या पत्रातील मागणीमध्ये कोणत्याही बांधकाम व्यावसायिक किंवा विशिष्ट समाजाचा उल्लेख केला नसला तरी सूत्रांच्या माहितीनुसार मनसेच्या निशाण्यावर गुजराती आणि जैन समुदाय आहे.