मरेवर फुकट्या प्रवाशांच्या संखेत वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2014

मरेवर फुकट्या प्रवाशांच्या संखेत वाढ

मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्य रेल्वे मार्गावर ऑक्टोबर महिन्यात राबवण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल २ लाख ४४ हजार गुन्हे फुकट्या प्रवाशांविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत सुमारे १३ करोड २ लाख रुपयांचा दंड या फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आला आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर ऑक्टोबर महिन्यामध्ये तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत मध्य रेल्वेच्या मेन लाइन, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांचे तिकीट तपासले असता २ लाख ४४ फुकटे प्रवासी सापडले आहेत. त्यांच्याकडून १३ कोटी २ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये १ लाख ७३ हजार फुकट्यांकडून ८ कोटी ११ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी फुकट्यांची संख्या ४१.0४ टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या महिन्यांमध्ये १३ लाख १0 हजार फुकटे प्रवासी पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून ६४ कोटी ६४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर २0१३ या महिन्यांमध्ये ११ लाख २0 हजार फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून ५२ कोटी ३१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत ४२४ जणांनी आपले आरक्षित तिकीट दुसर्‍या प्रवाशाला देण्याचा गुन्हा केला आहे. त्यांच्याक डून २ कोटी ९४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर फुकट प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे प्रवाशांनी विदाऊट तिकीट प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Post Bottom Ad