मुंबई : भायखळा पश्चिम स्थित ‘साई’ (सोशल ऍक्टिव्हिटीज इंटिग्रेशन) या देहविक्रय करणाऱ्या महिलांचा उत्कर्ष करणाऱ्यासामाजिक संस्थेतर्फे भायखळ्यातील मनपा शाळेत गुरुवारी बालदिन उत्साहा त पार पडला. या वेळी पं. नेहरूंच्या जन्मदिनाचे तसेच ‘साई’ला २३ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत लहान मुलांना प्रेरणा मिळावी या हेतूने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुलांसाठीच ित्रकला स्पर्धा तसेच मुलांमध्ये असणारा ‘अभ्यासावि षयी न्यूनगंड कसा दूर करावा’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.
परिसंवादात प्रमुख वक्ते एज्यु केशन इंजिनियर आणि समुपदेशक म्हणून ख्यात असलेल्या मोहन पाखरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लहान मुलांच्या मनातील प ्रश्न ते अचूकपणे टिपत त्यांच् या अभ्यासा विषयी असणाऱ्या शंका त्यांनी दूर केल्या. परिसंवादाला मुलांनीउत ्स्फूर्त आणि हसत-खेळत प्रतिसाद देत प्रश् नही विचारले. मान्यवरांनीही प् रश्नाला सहजतेने उत्तरही देत चर ्चेच्या माध्यमातून वातावरणखेळीमेळीचे केले. मुलां ना याप्रकारे सहभागी होताना पाहून पालकांचे चेहरे आनंदून गेले होते. चित्रकला स्पर्धेत मुलां नी कागदावर आपलेस्वप्नातील भा वविश्व रेखाटत मनाप्रमाणे चित्र काढली. मुक्तहस्त, निसर्गचित्र , प्राणी, वस्तू अशी नानाविध सुंदर चित्रं मुलांनी यावेळी रेखाटली.
‘साई’चे संचालक विनय वस्त म्हणाले की, ‘ज्या मुलांना शिक्षणाचा गंधही नाही, जी मुलं शिक्षण घेण्यापासून वंचित आहेत अशा मुलांना व त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरीत करून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आम्ही हातभार लावत असतो. शैक्षणिक जनजागृती ही मुलांबरोबर त्यांच्या पालकांमध्येही होणे गरजेचे असते. जेणे करून ते आपल्या मुलांना चांगले जीवन व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रोत्साहित करतील. असे विविध कार्यक्रम ‘साई’ सातत्याने आयोजित करत असते.
एज्युकेशन इंजिनियर आणि समुपदे शक मोहन पाखरे यांनी मुलांना आपण आपल्या बुद्धिचा वापर जर शंभर टक्के केला तर ऐंशी-नव्वद टक्के गुण सहजतेने असे घेऊ शकतो हे सांगितले. गणित हा विषय मुलांना कठीण जाणार नाही या अनुषंगाने ‘झिरो रिले’ म्हणजेच मैदानी गणित या खेळामार्फत एक ते शंभर पाढे कसे लक्षात ठेवायचे हे त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले. अक्षरांपेक्षा चित्रांच्या माध्यमातून मुलं अभ्यास चांगल्यारित्या लक्षात ठेवू शकतात असेही पाखरेंनी यावेळी उपस्थित पालकांना सांगितले. या वेळी कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक टी.बी.पोटे उपस्थित होते.