मुंबई : स्वच्छता हे केवळ अभियान न राहता तो नित्यनियम बनणे आवश्यक आहे. आपण जसे भूक लागली की जेवतो तसाच नित्यनियम स्वच्छतेच्याही बाबतीत आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज न्यू एनिशिएटिव्ह फॉर जॉइंट अँक्शन नाऊ (मुनीजन) मार्फत स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आली. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर, प्र-कुलगुरु डॉ. नरेश चंद्र आणि राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू उपस्थित होते.
आजच्या तरुणाईने स्वच्छता हे जीवनमूल्य स्वीकारून भारत स्वच्छ अभियानात सहभागी झाले पाहिजे. सामाजिक मूल्यांमध्ये आपला सहभाग दिला तर इथे उपस्थित असलेल्या गुणीजनांच्या माध्यमातून 'मुनीजन' हा उपक्रम यशस्वी होऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्याकरिता युवाशक्ती एकत्रित होणे आवश्यक आहे. आज राज्य शासनासमोर गृह आणि शिक्षण हे दोन विषय प्राथमिकतेच असून शिक्षणामध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे विनोद तावडे यांनी या वेळी सांगितले.