पवई येथील डॉ. आंबेडकर उद्यानात पूर्णाकृती पुतळ्यासाठी सोमवारी उपोषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2014

पवई येथील डॉ. आंबेडकर उद्यानात पूर्णाकृती पुतळ्यासाठी सोमवारी उपोषण

मुंबई / अजेयकुमार जाधव 
पवई येथील प्रसिद्ध अश्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात गेल्या कित्येक वर्षा पासून बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी पवईकर नागरिक करत आहेत. संबंधित जागेवर बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण करूनही मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांनी पुतळा बसविण्यास स्थगिती दिली आहे. पालिका प्रशासन बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध करत असल्याच्या निषेधार्थ पवई तलाव सेवा समिती व पवई येथील स्थानिक आंबेडकरी जनतेच्या वतीने सोमवारी ( 1 DEC. 2014 ) आमरण उपोषण केले जात आहे.  

पवई तलाव सेवा समिती सन २००७ पासून मुंबई महानगर पालिकेकडे पवई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करत आहे. याबाबत मुंबई महानगर पालिकेच्या विधी समितीमध्ये दिनांक १५ -८-२००८ रोजी ठराव (क्रमांक ८५) एकमताने मंजूर करण्यात आला आहे. बाबासाहेबांचा पुतळा उभारावा म्हणून दि. ७-४-२०१० रोजी (डिवाय. एच / १२७ च्या पत्राने) पुतळा उभारण्याच्या प्रस्तावास पालिका आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. 

पवई तलाव समितीला त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अटींची पुर्तता करण्यास सांगण्यात आले. समितीने या अटींची पूर्तता केल्यावर जागेच्या ना हरकत प्रमाणपत्रा साठी व जागेच्या भाड्याचे पैसे भरण्यासाठी परवानगी परवानगी मागितली असता पालिका पालिका आयुक्तांनी सुप्रीम कोर्टाच्या दिनांक १-१-२०१३ च्या निर्देशान्वये पुतळा उभारण्यास परवानगी देत नसल्याचे कळविले आहे. 

बाबासाहेबांचा पुतळा उभारावा असा प्रस्ताव सन २००८ साली मंजूर झाला असताना पालिकेने सहा वर्षे वेळकाढू पणा केला आहे. पालिकेच्या या वेळकाढू पणाच्या प्रवृत्तीमुळे आंबेडकरी जनतेत तीव्र संतापाची लाट पसरली असून समिती आणि स्थानिक आंबेडकरी जनतेच्या वतीने सोमवार १ डिसेंबर रोजी पवई येथील डॉ.  आंबेडकर उद्यान येथे उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश (बाबा) बिऱ्हाडे, प्रदीप खरात, सुरेश ढवळे, कल्याण बोबडे, विजय जोहरे, आकाश बगाळे इत्यादि लोक उपोषणात सहभागी होऊन नेतृत्व करणार आहेत.

Post Bottom Ad