बहुजन मुख्यमंत्री व्हावा हीच मतदारांची इच्छा होती - एकनाथ खडसे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 November 2014

बहुजन मुख्यमंत्री व्हावा हीच मतदारांची इच्छा होती - एकनाथ खडसे

पंढरपूर - बहुजन आणि ओबीसी समाजाने भाजपला सत्ता मिळवून दिली. बहुजन समाजाने राज्याचे नेतृत्व करावे, हीच मतदारांची इच्छा होती, अशी मनातली सल आज महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी खडसे दांपत्य हेलिकॉप्टरने दुपारी ४ वाजता दाखल झाले. विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना खडसे म्हणाले, पदनिवडीचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा असतो. तो सर्व कसोट्यांवर घेतला जातो. आता मला मुख्यमंत्री पदापेक्षा राज्यात माझ्या पक्षाची सत्ता आली याचे अधिक समाधान आहे. मी मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा बाळगणे यात काहीही गैर नव्हते, असे सांगून खडसे पुढे म्हणाले, आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या या महापूजेचा मान एकदा तरी मिळायला हवा असे वाटत होते. आपले हे गार्‍हाणे बा विठ्ठलाने ऐकले. कदाचित मी मुख्यमंत्री म्हणून आषाढीची महापूजा करावी अशी विठ्ठलाचीच इच्छा नसेल. तरी या पूजेचा मान मिळाला ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.

Post Bottom Ad