चेक वठवताना ग्राहकांना एसएमएस करणे बँकांवर बंधनकारक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2014

चेक वठवताना ग्राहकांना एसएमएस करणे बँकांवर बंधनकारक

मुंबई : देशात धनादेशासंबंधीच्या फसवणुकांमध्ये वाढ झाल्याबाबत चिंता व्यक्त करतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेने चेक वठवण्यासंबंधीची माहिती दोन्ही पक्षांना तत्काळ एसएमएसद्वारे कळवणे बँकांसाठी बंधनकारक केले आहे. विशेषकरून उच्चमूल्याच्या चेक व्यवहारांची माहिती संबंधित दोन्ही पक्षांना एसएमएसद्वारे तत्काळ कळवली गेली पाहिजे, असा आग्रह आरबीआयने केला आहे. तसेच उच्चमूल्याचे धनादेश वठवण्यावेळी संबंधित ग्राहकांशी फोन संपर्क साधावा, असेही आरबीआयने बँकांना सूचित केले आहे. 


आतापर्यंत देशात क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठीच एसएमएस अँलर्ट सेवा बंधनकारक होती. यापुढे चेक वठवण्याची प्रक्रिया केवळ यांत्रिक प्रक्रिया नसावी तर बँकांनी त्यात जातीने लक्ष घालावे. खासकरून उपकरणांचा दर्जा आणि नेमलेल्या व्यक्ती याकडे बँकांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे आरबीआयचे म्हणणे आहे. देशात चेकसंबंधित फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. चेक वठवताना काळजी घेण्याचे उपाय असते तर हे फसवणुकीचे प्रकार सहज टाळले गेले असते, असेही आरबीआयचे म्हणणे आहे. यापुढे २ लाखांपुढील रकमेचे सर्व धनादेश अतिनील किरणांद्वारे तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ५ लाखांपुढील धनादेश विविध पातळ्य़ांवर तपासून पाहण्यात यावेत, असेही आरबीआयने बँकांना सूचित केले आहे.

Post Bottom Ad