परेवर एसी लोकल मार्चनंतर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2014

परेवर एसी लोकल मार्चनंतर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारी पश्‍चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल आता मार्च २0१५ मध्ये येणार आहे. तसेच या लोकलच्या संपूर्ण चाचण्या झाल्यानंतरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्यामुळे तिला आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे नेमका किती वेळ लागणार हे स्पष्ट झालेले नाही.

परेवर चालवण्यात येणारी एसी लोकल ही गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या लोकलने बर्‍याच डेडलाईन यापूर्वी चुकवल्या आहेत. एसी लोकलचे तिकीट ४00 रुपये असेल यापासून तिचा रंग याविषयी सगळय़ा चर्चा झाल्या. तसेच ही लोकल १५ ऑगस्टला धावणार असेही यापूर्वी सांगण्यात आले होते. परंतु त्या सर्व वावड्या ठरल्या. परेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी एसी लोकलचे डबे आणि सुट्टे भाग मार्च २0१५ मध्ये मुंबईत येतील, असा विश्‍वास व्यक्त केला असल्यामुळे पुन्हा एकदा एसी लोकलविषयी आशा निर्माण झाली आहे. एसी लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावताना अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे एसी करंटवर धावणार्‍या र्जमन बनावटीच्या बम्बार्डिअर कंपनीच्या लोकलच्या नव्या कोचची निर्मिती करत असतानाच संबंधित कंपनीला कॅमेरे बसवण्यास सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad