राधाकृष्ण विखे पाटील कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2014

राधाकृष्ण विखे पाटील कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते

महाराष्ट्र विधानसभेमधील कॉंग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली. अहमदनगरसारख्या सधन ऊस पट्टयामधील महत्त्वपूर्ण नेते असलेले विखे-पाटील हे अनेक वर्षांपासून आमदार आहेत. विखे पाटील हे याआधीच्या शिवसेना-भाजप सरकारमध्येही कृषी मंत्री होते. पक्षनेत्याची निवड करण्याचे सर्वाधिकार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात आले होते. 

महाराष्ट्रामधील गेल्या 15 वर्षांची सत्ता कॉंग्रेस पक्षाला गमवावी लागली असून 288 सदस्यांची क्षमता असलेल्या राज्य विधानसभेमध्ये कॉंग्रेसचे संख्यबळ 42 पर्यंत घटले आहे. भाजप व शिवसेनेनंतर कॉंग्रेस हा तिसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र चौथ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा कॉंग्रेसकडे केवळ एक जागा जास्त आहे. विखे पाटील यांच्या समोरील आव्हान या पार्श्‍वभूमीवर बिकट असल्याचे मानले जात आहे

Post Bottom Ad