विधिमंडळात शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबई महापालिकेतील सत्तेला कोणताही धोका नाही. मात्र पालिकेची तिजोरी असलेल्या स्थायी समिती तसेच इतर वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला भाजप अडचणीत आणू शकते. तसेच स्थायी समितीत येणाऱ्या प्रस्तावांना लगाम लावून सेनेची आर्थिक रसद तोडण्याचा प्रयत्नही भाजप करण्याची शक्यता आहे.
पालिकेत महापौरपदाची निवडणूक तीन महिन्यांपूर्वीच पार पडली असून पुढील महापौर २०१७च्या पालिका निवडणुकीत निवडला जाणार आहे. त्यामुळे तुर्तास शिवसेनेची पालिकेतील सत्ता कायम राहणार आहे. मात्र पालिकेचे आर्थिक सत्ता केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घेऊन सेनेला झटका देऊ शकते.
मनसेच्या बळावर सत्तेचा दोर
भाजपने शिवसेनेचा पाठिंबा काढला किंवा स्थायी समितीत विरोधी पवित्रा घेतला तर मनसे सेनेच्या मदतीच्या धावून येणार असल्याचे बोलले जाते. पालिकेत सेनेकडे ७५ अधिक १३ अपक्ष मिळून ८८ नगरसेवकांचे बळ आहे. मनसेचे २८ नगरसेवक आहेत. या दोन्ही पक्षांची मिळून ११६ संख्या होते. बहुमतासाठी पालिकेत ११४ मतांची आवश्यकता आहे. ती संख्या मनसे-सेना युती भरून काढते.
स्थायीची नौकाही पार
स्थायी समितीत एकूण २७ नगरसेवक असून सेना-मनसे एकत्र आल्यास दोघांची संख्या ११ होते. सेनासमर्थक अखिल भारतीय सेना व एक अपक्षाची साथ घेऊन सेना-मनसेचे संख्याबळ १३वर जाते. समाजवादी पक्ष पालिकेतील सर्वच निवडणुकीत कायम तटस्थ राहत असल्याने त्याचा लाभ सेनेला होऊन स्थायीची नौका सेना पार करू शकते.
स्थायी समितीचे बलाबलसेना ८
भाजप ४
काँग्रेस ६
राष्ट्रवादी २
मनसे ३
सपा १
अभासे १
अपक्ष १