मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या विविध मागण्यांसाठी आणि विविध प्रलंबित प्रश्न्न सोडवण्यासाठी आज शेकडो अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानातील मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
आपल्या मानधनाची रक्कम देण्यासाठी आदेश देण्यात यावेत, अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्यात यावी , यंदाची भाऊबीज देण्याची मान्य करूनही अध्याप मिळालेली नाही ती त्यरित देण्यात यावी, दरवर्षी मी महिन्याची सुट्टी देण्यात यावी, तसेच २१ दिवसांची आजार पणाची पगारी रजा देण्यात यावी व हॉस्पिटल मध्ये प्रविष्ट असलेला कालावधीत पूर्ण मानधन मिळावे , अंगणवाडीत दिल्या जाणार्या निकृष्ट आहारात बदल करावा, सेविकांना राष्ट्रीय कृत बँकेतून मानधन देण्यात यावे अश्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या अध्यक्षततेखाली शेकडो अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद मोर्चा काढला.