मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये डेंग्यूने थैमान घातले असताना रुग्णांना हव्या असलेल्या प्लेटलेट्सही कमी प्रमाणात मिळत आहेत. यामुळे पालिकेच्या केएम रुग्णालयात बंद पडलेले प्लाझ्मा सेंटर त्वरित सुरु करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज पालिका आयुक्तांक्कडे केली आहे.
मुंबईत डेंग्यू फैलावत असताना पालिका अधिकारी कर्मचारी व नागरिक यांच्यामध्ये समन्वय नसल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हि भीती घालवण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व एनजीओना विश्वासात घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली . पालिकेचे अधिकारी देण्ग्युबाबत खोटी आकडेवारी सादर करत आहेत . औषधे नाहीत अशी परिस्थिती असल्याने रुग्णाना दिलासा देण्यासाठी डेंग्यूवरील उपचार मोफत करावेत रुग्णांना मोफत प्लेटलेट्स पुरवण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली. १९८३ साली शरद पवार यांनी सुरु केलेले केईएम मधील प्लाझ्मा सेंटर केले. यावेळी दुप्पट प्लेटलेटसचा साठा करीत असल्याचा ठपका ठेवत हे मशीन बंद करण्यात आले. हे सेंटर पालिका अधिकारी आणि खासगी कंपन्यांच्या संगनमताने बंद केल्याचा आरोप पवार यांनी केला. जर हे प्लाझ्मा सेंटर आज सुरु असते तर आज मुंबईमध्ये प्लेटलेट्स ची कमतरता भासली नसती. याप्रकरणी संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात हे मशीन हलविण्यात आले असून तेथेही त्यावर धुळ चढली आहे. मात्र, डेंग्यूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता हे मशीन त्वरीत सुरु करावे असे पवार म्हणाले. डेंग्यूला आकडेवारी वाढत असताना आरोग्य विभाग दिशाभूल करणारी आकडेवारी सादर करीत असल्याची तक्रार शिष्ठमंडळाने आयुक्तांकडे केली आहे. याबाबत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी विशेष बैठक लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे पवार म्हणाले. शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादीचे संजय पाटील , धनंजय पिसाळ , सैईदा खान, रविंद्र पवार इत्यादींचा समावेश होता.