'हल्लाबोल'साठी राज्यभरातून लाखो भीमसैनिक मुंबईकडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2014

'हल्लाबोल'साठी राज्यभरातून लाखो भीमसैनिक मुंबईकडे

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे-खालसा या गावामधील दलित समाजाचे तिहेरी हत्याकांड उलटून महिना लोटला, तरी अद्यापि आरोपींचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले नाही. या निषेधार्थ भीमशक्ती संघटनेने मंगळवारी मुंबईत हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले असून, या मोर्चाचे नेतृत्व भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे करणार आहेत. या मोर्चासाठी राज्यभरातून लाखो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

आझाद मैदानातून मंगळवारी दुपारी १ वाजता हा मोर्चा निघणार आहे. राज्यभरातून जवळपास एक लाख भीमसैनिक मोर्चात सामील होतील, अशी माहिती भीमशक्तीचे मुंबई अध्यक्ष शशिकांत बनसोडे यांनी दिली. महाराष्ट्रात दलितांवर वाढत असलेल्या अत्याचारांबाबत हंडोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून जवखेडे हत्याकांडातील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली आहे. मात्र सरकार अजूनही याबाबतीत कठोर पावले उचलत नसल्याने हंडोरे यांनी मोर्चाचे शस्त्र उपसले आहे. यासंबंधी शशिकांत बनसोडे यांनी आम्ही दलितांवर होणार्‍या अन्याय अत्याचारांविरोधात राज्यभर रण पेटवणार असल्याचे सांगितले. राज्यभरातून किमान लाखभर भीमसैनिक या मोर्चासाठी येणार आहेत. ते आझाद मैदानातून मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघतील, असे स्पष्ट करून बनसोडे यांनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी भीमसैनिकांनी मोठय़ा संख्येने सामील व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Post Bottom Ad