दहावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2014

दहावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार, १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दहावीसाठी पहिल्यांदाच होणा-या या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा कार्यक्रम शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केला. 

११ ते २० नोव्हेंबपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार असून, त्यानंतर २१ ते २८ नोव्हेंबपर्यंत विलंब शुल्क आकारण्यात येईल. दहावीचे हे परीक्षा अर्ज विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या माध्यमातून अर्ज भरता येणार असून यापूर्वीच शाळांकडून माहिती गोळा करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील वर्षापासून सुरू केली आहे. यंदा दहावीसाठी ही प्रक्रिया पहिल्यांदाच राबवण्यात येणार असून इंटरनेटसंदर्भात तसेच इतर काही अडचणी उद्भवल्यास ग्रामीण भागातील शाळांना सूट देण्याचा विचारही शिक्षण मंडळाने केला आहे.

Post Bottom Ad