दलित आश्रमशाळांना सरकारी अनुदान मिळणार? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 November 2014

दलित आश्रमशाळांना सरकारी अनुदान मिळणार?

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दलित आश्रमशाळांच्या अनुदानाचा गेली बारा तेरा वर्षे रेंगाळत पडलेला प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन समाजकल्याणमंत्री विष्णू सावरा व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आश्रमशाळा कर्मचारी व संचालकांच्या शिष्टमंडळाला दिले. 

महाराष्ट्रातील अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी संस्थांनी चालवलेल्या २९० आश्रमशाळा गेली बारा तेरा वर्ष विना अनुदानित आहेत. सर्व विना अनुदानित आश्रमशाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र दलित विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या आश्रमशाळांना मागील काँग्रेस आघाडी सरकारने शेवटपर्यंत अनुदानापासून वंचित ठेवले. या शाळा चालवणारे संस्थाचालक व कर्मचारी गेली अनेक वर्षे अनुदानासाठी संघर्ष करीत होते. भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत पुढाकार घेऊन आश्रमशाळा कर्मचारी व संचालकांच्या शिष्टमंडळासह मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्या व अनुदानासंबंधी निवेदन दिले. त्यावेळी लवकरात लवकर या आश्रमशाळांना अनुदान देण्याचा प्रयत्न आपण करू असे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी दिले आहे.

Post Bottom Ad