मराठा आरक्षण टिकायलाच हवं - देवेंद्र फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2014

मराठा आरक्षण टिकायलाच हवं - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षण टिकायलाच हवं - देवेंद्र फडणवीस
मुंबई : मराठा आरक्षण टिकायलाच हवं... आणि त्यासाठी शक्य ते प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. उच्च न्यायालयानं  मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. मराठा आरक्षण टिकण्यासाठी गरज पडली तर सुप्रीम कोर्टातही जाणार, असंही त्यांनी म्हटलंय. आरक्षण देताना काही तांत्रिक त्रुटी दाखवल्या असतील तर नागपूरच्या अधिवेशनात दूर करण्याचा प्रयत्न करू, असंही फडणवीस यांनी म्हटलंय. 

मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला पूर्णत स्थगिती देलीय पण, मुस्लिमांच्या बाबतीत शिक्षणा आणि नोकरीच्या बाबतीत पुन्हा एकदा सरकारनं विचार करावा, असा सल्लाही दिलाय. पण, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केवळ मराठा आरक्षणाचा उल्लेख आपल्या बोलण्यात केलाय. 
http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/cm-devendra-fadanvis-on-maratha-reservation/260235

Post Bottom Ad