पुणे - भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो; परंतु राज्यातील अनेक कार्यालयांत हा दिन साजरा केला जात नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये तर या दिनाची माहितीच नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्य शासन या दिनाची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत असल्याचे समोर येत आहे.
भारतातील घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर 26 जानेवारी 195 पासून देशभर तिची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जावा, अशी लोकशहीप्रेमी संस्था-संघटना यांची मागणी होती. तिला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाने दि. 24 नोव्हेंबर 2क्क्8 रोजी शासन निर्णय घेऊन राज्यभर ‘संविधान दिन’ साजरा करावा, असा आदेश निर्गमित केला. परंतु, सध्या राज्यात या दिनाची अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे.
या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालयांत ‘संविधान दिन’ साजरा करावा, असे म्हटले आहे. यात संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करावे, संविधानाची रॅली काढावी, त्यातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, जबाबदा:या यांचे बॅनर, पोस्टर लावले नाहीत. संविधान रॅली अथवा मूलभूत हक्क, कर्तव्य यावर मान्यवरांची व्याख्याने ठेवणो आवश्यक असते; परंतु यांपैकी काहीच झालेले नाही, असे पवार म्हणाले.