डेंगीबरोबर आला स्वाइन फ्लू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 November 2014

डेंगीबरोबर आला स्वाइन फ्लू

मुंबई - डेंगीच्या तापामुळे मुंबईतील नागरिक हैराण झालेले असतानाच स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात डेंगीचे 41 नवे रुग्ण मुंबईत दाखल झाले असून, स्वाइन फ्लूचा एक रुग्णही आढळला आहे. तापाचे रुग्णही वाढू लागले आहेत. 


मुंबईत डेंगी, हिवताप आणि तापाचे रुग्ण वाढलेले असतानाच आता स्वाइन फ्लूचा रुग्णही आढळल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या आठवड्यातच स्वाइन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू झाला असून, काही दिवसांपूर्वी नवा रुग्णही आढळला आहे. डेंगीचे प्रमाण आटोक्‍यात असल्याचा दावा प्रशासनाने केला होता; पण गेल्या महिन्यात 213 आणि या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 41 रुग्ण आढळले आहेत.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील रुग्ण 
ताप- 2528
हिवताप- 181
डेंगी- 41
स्वाइन फ्लू- एक
गॅस्ट्रो- 168

Post Bottom Ad