मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील दलित अत्याचाराच्या घटना पाहता, हा जिल्हा मानवी अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची प्रमुख मागणी करीत बौद्धजन पंचायत समितीने मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. सात दिवसांत अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना अटक झाली नाही, तर ‘मुंबई बंद’ची हाक समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे.
भायखळा येथून निघालेल्या मोर्चाचे रूपांतर आझाद मैदानात जाहीर सभेत झाले. या वेळी ते म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर 2014 दरम्यान अनेक घटनांची नोंद झाली आहे. जातीयवादातून यातील बहुतेक प्रकरणो झाली आहेत. त्यामुळे राजकीय दबावामुळे महत्त्वाच्या प्रकरणांतील आरोपी फरार आहेत. त्यामुळे ही प्रकरणो सीबीआयकडे देण्याची गरज आहे.