दुकानदारांचा स्वच्छता अभियानात सहभाग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2014

दुकानदारांचा स्वच्छता अभियानात सहभाग

साडेतीन लाख दुकानदार आणि रेस्टॉरंट मालक स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत. एकाच वेळी २४ विभागांमध्ये '२४ बाय ७' हे अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छता अभियान राबवताना प्रत्येक विभागाची स्वतंत्र 'ओळख' निर्माण होण्यासाठी ठरावीक रंगातील कचरा डबाही दुकानासमोर ठेवण्याचे आदेश सर्व दुकानदारांना देण्यात आले आहेत. यासाठी २४ विभागीच निर्मिती करण्यात आली आहे. तेथील प्रत्येक दुकानांसमोर निश्‍चित केलेल्या रंगाचा कचरा डबा ठेवण्यात येणार आहे. दुकानदार त्याचे कसोशीने पालन करतात की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीदेखील दुकाने आणि आस्थापना विभागातील १0९ निरीक्षकांवर सोपवण्यात आली आहे.

Post Bottom Ad