दहा लाख बँक कर्मचा-यांचा बुधवारी संप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2014

दहा लाख बँक कर्मचा-यांचा बुधवारी संप

वेतनवाढीसंदर्भात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) आणि इंडियन बँक्स असोसिएशन्स (आयबीए) यांच्यातील चर्चेची १४ वी फेरीही सोमवारी निष्फळ ठरल्याने उद्या, बुधवारी (१२ नोव्हेंबर) होणारा दहा लाख बँक कर्मचा‍ऱ्यांचा देशव्यापी संप अटळ झाला आहे. या संपामुळे बँकांचे कामकाज पूर्णतः विस्कळीत होणार आहे. चेक वठवणी तसेच एटीएम सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

वेतनवाढीचा करार ऑक्टोबर २०१२ मध्ये संपला आहे. बँक संघटनांनी २३ टक्के वेतनवाढीची मागणी केली असून ती 'आयबीए'ने फेटाळली आहे. 'आयबीए'ने ११ टक्के वाढीचा प्रस्ताव कायम ठेवला आहे. या संदर्भात चीफ लेबर कमिशनर यांच्याशीही चर्चा झाली होती. मात्र, दोन्ही पक्षांच्या ताठर भूमिकेमुळे बँक कर्मचा‍ऱ्यांना वेतनवाढ मिळालेली नाही.

गेले वर्षभर बँक संघटना आंदोलन करीत असून त्या आता अधिक आक्रमक झाल्या आहेत. १० लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी यांचे देशव्यापी प्रतिनिधितव करणाऱ्या नऊ संघटनांनी हा संप पुकारला आहे. सर्व राज्यांत व जिल्ह्यांत बुधवारी ‌ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत. मुंबईतही दुपारी १२ वाजता आझाद मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती 'यूएफबीयू'चे निमंत्रक विश्वास उटगी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. वेतनवाढीच्या प्रश्नाबरोबर कामाचे तास नियमबद्ध करावेत, पाच दिवसांचा आठवडा करावा, आऊटसोर्सिंगला आळा घालावा आणि नोकरभरती त्वरित सुरू करावी आदी महत्त्वाच्या मागण्या बँक कर्मचा‍ऱ्यांनी केल्या आहेत.

Post Bottom Ad