मुलांच्या अधिकारांबाबत जागरुकता आवश्यक - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 November 2014

मुलांच्या अधिकारांबाबत जागरुकता आवश्यक - महापौर

मुंबई : लहान मुले ही उद्याच्या भारताचे आधारस्तंभ व सुजाण नागरिक असणार असून देशाचे भविष्य आहेत, ही बाब लक्षात घेऊन मुलांवर संस्कार करत असताना त्यांच्या अधिकाराबाबत जागरूक असले पाहिजे, असे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले. जागतिक बाल अधिकार दिनानिमित्त महापौरांच्या दालनात आयोजित एका कार्यक्रमात मुंबईतील विविध भागातून आलेल्या लहान मुलांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या. 

'जागतिक बाल अधिकार दिवस' घोषित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने लहान मुलांचे अधिकार या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या मुंबईतील संस्थांनी पुढाकार घेऊन मुलांना महापौरांशी थेटपणे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मुलांनी आपल्या परिसरातील शाळा, उद्याने, मैदाने, पाणी यासारख्या विविध बाबींवर महापौरांशी चर्चा केली. महापौरांनीदेखील कौतुकाने व उत्सुकतेने मुलांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांनी स्वत: तयार केलेली पुस्तके, चित्रे यासह एक निवेदन महापौरांना दिले. याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा पूजा महाडेश्‍वर, प्रभाग समिती अध्यक्षा (एफ/दक्षिण व एफ/उत्तर) प्रणिता वाघधरे, नगरसेवक दिलीप पटेल, नगरसेविका संध्या यादव व रेश्मा नेवरेकर हे मान्यवर उपस्थित होते. गुरुवारी संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील युवा, ऊर्जा, घरहक्क समिती, सीसीडीटी, जेएमडब्ल्यू फाऊंडेशन यासारख्या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

Post Bottom Ad