'राईट टू पी' अभियानास आवश्यक ते सर्व सहकार्य करून पाठपुरावा करणार - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 November 2014

'राईट टू पी' अभियानास आवश्यक ते सर्व सहकार्य करून पाठपुरावा करणार - महापौर

Displaying NRK_0192.JPG
महिलांसाठी सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छता गृहांची संख्या वाढावी, तसेच असणारी स्वच्छता-गृहे अधिकाधिक  गुणवत्तापूर्ण,स्वच्छचांगली व सुरक्षित असावीत; यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य  करून पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाच्या सभागृहात महापालिकाऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन व 'राईट टू पीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. 


 याप्रसंगी महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकरप्रमुख कामगार अधिकारी शुभदा कामतेसमाजसेविका ज्योतीताई म्हापसेकरसावित्रीबाई स्त्री संसाधन केंद्राच्या सचिव व रा.ए.स्मा. रुग्णालयातील प्रा. डॉ. कामाक्षी भाटेनायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठात्री (प्र.) डॉ. दीक्षित आणि ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. सुधींद्र कुलकर्णी  यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. 

या कार्यक्रमादरम्यान महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते 'टॉयलेट टॉर्चरह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनीकार्यकर्त्यांनी आपली मनोगते मांडली. तसेच विषयानुरूप संगणकीय सादरीकरणासह पथनाट्य व गाण्यांचे सादरीकरण देखील कार्यक्रमादरम्यान करण्यात आले. 

Post Bottom Ad