मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी आणि मिलिंद म्हैसकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून नियुक्ती करत प्रशासनात मोठय़ा फेरबदलाचे संकेत दिले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती मिळावी यासाठी सनदी अधिकार्यांत चढाओढ लागली होती. यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार पाहणार्या काही अधिकार्यांनी त्यासाठी प्रयत्न चालवले होते. मात्र पंतप्रधानपदी आल्यावर नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सरकारच्या वेळी असणारे अधिकारी सचिवालयात नियुक्त करायचे नाहीत असा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा प्रशासनात मोठे फेरबदल करण्याची तयारी चालवली असून स्वत:च्या कार्यालयापासून त्याची सुरुवात केली आहे. वन विभागाची जबाबदारी सांभाळणारे प्रवीण परदेशी आणि मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात केली आहे.