मुख्यमंत्री कोट्यातील घरांची चौकशी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2014

मुख्यमंत्री कोट्यातील घरांची चौकशी होणार

मुंबई : म्हाडाच्या माध्यमातून मुख्यमंत्री कोट्यातील घरांचे वितरण गेले ३ वर्षे थांबवण्यात आले असतानाच या पूर्वीच्या सर्व घरांच्या वाटपाची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच न्यायालयाने दिल्याने तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या घरे वाटपाबाबत दणका मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

म्हाडाच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे सातत्याने सोडत काढण्यात येत असून यामध्ये २ टक्के घरांचा कोटा हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातून वितरित करण्यात येतात. मात्र, काही वेळेस कलाकार अथवा मंत्रालयाशी संबंधित अधिकार्‍यांना एकाहून अधिक घरे मिळाल्याचे दिसून आल्याने आणि अशाच वादाचे निमित्त ठरून मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेल्या राजकीय नेत्यांमुळे मुख्यमंत्री कोट्यातील घरांचे वाटप थांबवण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता. त्यामुळे गेल्या ३ वर्षांच्या सोडतीतील १00हून अधिक घरांचे वितरण करण्यात आले नाही. 

मुख्यमंत्री कोट्यातून ५ टक्के व २ टक्के कोट्यातून आतापर्यंत १३00 घरांचे वितरण केल्याचे दिसून आले आहे. घरांचे वितरण करताना कोणते निकष वापरण्यात आले, निवड कशी काय ठरवण्यात आली, एकापेक्षा अधिक घरे कुणाला मिळाली? असे अनेक प्रश्न न्यायालयाकडून विचारण्यात आले असून म्हाडा घरांचे वितरण मंत्रालयातून कसे काय? असेही प्रश्न विचारण्यात आले आहे. या घरांपैकी ७५ घरे विलासराव देशमुख, ६0 घरे सुशीलकुमार शिंदे व १५0 हून अधिक घरे अशोक चव्हाण यांच्या कारकिर्दीत वितरित करण्यात आली आहेत. ही घरे कलाकार, पत्रकार, न्यायाधीश, पोलीस यांना दिल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे कलाकार किंवा संबंधित प्रवर्गावरोबच ज्यांना मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळाले आहे, अशांची चौकशी डिसेंबरपासून होणार आहे.

Post Bottom Ad