दुकानांसमोर कचरा आढळल्यास परवाना रद्द करा - भाजपा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2014

दुकानांसमोर कचरा आढळल्यास परवाना रद्द करा - भाजपा

मुंबई : डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांतील दुकानासमोर कचरा आढळल्यास संबंधित दुकानदाराचा परवाना (अनुज्ञापन) रद्द करण्याची मागणी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे. मुंबईत वाढलेले अनधिकृत फेरीवाले व अनधिकृत खाद्यपदार्थ स्टॉल हे या शहराला विद्रुप करण्यामागे मोठी भूमिका आहे. दुकानांसमोर कचरा आढळल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील आणि लोकांच्या घरांमध्ये असलेल्या कुंड्यांमध्ये पाणी आढळल्यास त्यांना अटक करण्यात येईल, अशी जाहिरात करूनही अनधिकृत फेरीवाले, स्टॉलधारक यांच्याविरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी तयारी केलेली दाखवत नाही. या अनधिकृत फेरीवाले आणि स्टॉलधारकांविरोधात तातडीने उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य त्या कार्यवाहीचे आदेश संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना द्यावेत, अशी मागणी कोटक यांनी केली आहे.

Post Bottom Ad