मुंबई - मध्य रेल्वेची वर्षाला केवळ ११० किलोमीटर्स रुळांची डागडुजी होत आहे. मध्य रेल्वेच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी रेल्वेकडे पैसा नसून यासंदर्भात आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन खासदार किरीट सोमय्या यांनी आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद यांची भेट घेतल्यानंतर दिले. महाव्यवस्थापक सूद आणि रेल्वे अधिकार्यांशी आज तासभर केलेल्या चर्चेनंतर ते बोलत होते. मध्य रेल्वेच्या मार्गांवर अलीकडे वारंवार गाड्या घसरणे, रुळांना तडे जाणे असे प्रकार प्रचंड वाढल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता खासदार किरीट सोमय्या यांनी महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांची भेट घेतली. गेल्या दोन महिन्यांत गाडी घसरण्यासारख्या अपघाताच्या सात घटना घडल्या आहेत. निधीच्या कमतरतेमुळे रुळांच्या डागडुजी आणि दुरुस्तीसाठी पैसा मिळत नसल्याने मध्य रेल्वेसमोर बिकट समस्या निर्माण झाली आहे. गेल्या तीन वर्षांत रूळ बदलण्याचे काम वर्षाला ३०० किलोमीटरच्या टप्प्यावरून ११० किलोमीटर इतके खाली आले आहे. रेल्वे, राज्य व केंद्र सरकारच्या १६ विभागांनी/खात्यांनी तयार केलेली रेल्वेच्या नियोजना संदर्भातील ८० कलमी योजना गेली अनेक वर्षे अमलात आणली गेली नसल्याचीही बाब उघड झाली आहे. या सर्व बाबी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तसेच केंद्राच्या नेतृत्वाच्या कानावर घालू असे आश्वासन खासदार किरीट सोमय्या यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आहे.
Post Top Ad
03 November 2014
Home
Unlabelled
रेल्वेकडे रुळांच्या डागडुजीसाठी पैसाच नाही
रेल्वेकडे रुळांच्या डागडुजीसाठी पैसाच नाही
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.