मुंबई / प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवखेडा येथे झालेल्या जाधव कुटुंबियांच्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ बहुजन कृती समिती वसई तालुका, रिपब्लिकन सेना, बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा, भारिप बहुजन महासंघ, बहुजन नाका कामगार संघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अजित खांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नालासोपारा येथे शूर्पारक मैदान ते सम्राट अशोक उड्डाणपूल असा मोर्चा काढण्यात आला.
हत्याकांडातील आरोपींना व सूत्रधारांना त्वरित अटक करावी,आरोपींना योग्य कलमे लावून कारवाई करावी, जवखेडा प्रकरणी पोलिसांची वेगळ्या यंत्राने मार्फत चौकशी करावी, गाव खेड्यातील अलापासंख्यांक आणि दलितांचे कायद्यानुसार संरक्षण करावे, ज्या गावात अशी हत्याकांडे होतील अश्या गावांना सरकारी मदत त्वरित बंद करावी, संबंधित गावाचे सरपंच आणि गरम सेवक यांना जबादार धरून त्यांच्यावर खटले भरावे अश्या मागण्यांचे एक निवेदन यावेळी देण्यात आले. तसेच पोलिस ठाण्यासमोर जाहीर श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी शेकडोंच्या संखेने विविध संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.