बेस्टमध्ये तीन महिन्यांत २४,९२५ फुकटे प्रवासी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2014

बेस्टमध्ये तीन महिन्यांत २४,९२५ फुकटे प्रवासी

मुंबई : उपनगरीय रेल्वेप्रमाणेच आता बेस्टच्या बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये फुकट प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये अशा फुकट्या प्रवाशांविरु द्ध केलेल्या क ारवाईमध्ये २४ हजार ९२५ फुकटे प्रवासी सापडले आहेत. त्यांच्याकडून १७ लाख ४७ हजार ४२२ रुपये एवढी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली आहे. 

बेस्ट बसगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांविरुद्ध तसेच खरेदी केलेल्या तिकिटाने प्रमाणित केलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणार्‍या प्रवाशांविरुद्ध बेस्ट प्रशासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत २४ हजार ९२५ फुकटे प्रवासी पकडण्यात आले असून त्यांच्याकडून १७ लाख ४७ हजार ४२२ रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. विदाऊट तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांना पकडण्यात आल्यानंतर त्या प्रवाशांनी प्रवासभाडे अधिक देय असलेल्या प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट रक्कम भरण्याचे नाकारल्यास मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४६0(ह) अन्वये एक महिना पोलीस कोठडी किंवा २00 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे होऊ शकतात. 

बसमधून प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे हे प्रत्येकाला बंधनकारक आहे. विनातिकीट प्रवास करणे हा सामाजिक गुन्हादेखील आहे. तेव्हा सर्व प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान आणि मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट खरेदी करावे, तसेच तिकिटावर प्रमाणित केलेल्या अंतराएवढाच प्रवास क रावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Post Bottom Ad