मुंबई : नौदल दिनानिमित्त यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा आरंभ नौदल बँडने झाला आहे. शिवाय २८ ते ३0 नोव्हेंबरपर्यंत नौदलाच्या युद्धनौका लोकांना जवळून पाहण्याची संधीही मिळणार आहे.
गेल्या दोन दिवसांत जॉगर्स पार्क, ओबेरॉय मॉल येथे नौदलाचे बँडवादन झाले असून ५ नोव्हेंबरला गेटवे ऑफ इंडिया, ७ नोव्हेंबरला हँगिंग गार्डन, ८ नोव्हेंबरला कुपरेज बँड स्टँड, ९ नोव्हेंबरला सेंट्रल पार्क (खारघर), १५ नोव्हेंबरला फिनिक्स मिल येथे बँड वादन सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत होणार आहे. शिवाय नौदलाच्या आयएनएचएस अश्विनी या रुग्णालयाच्या वतीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली १६, २३ नोव्हेंबर रोजी आणि २९ डिसेंबर रोजी सकाळी १0 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत अनुक्रमे करंजा (उरण), 'कॅब्ज' (मानखुर्द आणि एलिफंटा) येथे मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले आहे. बुधवारी, २६ नोव्हेंबर रोजी सहा किलोमीटर लांब खुली सागरी जलतरण स्पर्धा आयोजित केली असून त्यात १४ वर्षांवरील जलतरणपटूंना सहभागी होता येणार आहे. १६ वर्षांखालील महिला व पुरुष आणि मुले, १६ वर्षांखालील मुली, ५0 वर्षांवरील ज्येष्ठ आणि विशेष श्रेणी अशा सहा कॅ टेगरींत ही जलतरण स्पर्धा होणार आहे.
नौदलाच्या ताफ्यातील काही युद्धनौका २८ ते ३0 नोव्हेंबर रोजी सकाळी १0 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोकांसाठी खुल्या ठेवणार आहेत. बॅलार्ड इस्टेट येथील टायगर द्वारातून प्रेक्षकांना सोडण्यात येणार आहे. मात्र, प्रेक्षकांनी येताना सोबत कॅमेर्याची सुविधा असलेले मोबाईल संच, बॅग व अन्य सामान सुरक्षेच्या कारणास्तव आणू नये, असे आवाहन नौदलाने केले आहे.