रेल्वेतील नशेबाजांवर पोलिस करणार कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2014

रेल्वेतील नशेबाजांवर पोलिस करणार कारवाई

मुंबई - रेल्वेच्या हद्दीत अमली पदार्थांची नशा करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार आहेत. नुकतीच रेल्वे पोलिसांची मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या वेळी रेल्वेच्या परिसरातील नशेबाजांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

अमली पदार्थविरोधी पथकाने नशेबाजांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेमार्गालगतच्या झोपड्यांत अमली पदार्थांची विक्री होते. पोलिस कारवाई करण्यासाठी आल्यावर हे नशेबाज रेल्वेस्थानकांत घुसतात. हद्दीबाहेर गेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. रेल्वेचे ब्रिज आणि स्थानकांवर हे विक्रेते वावरत असतात. अनेक नशेबाज लोकलमधून प्रवास करतात. त्यातील काही जणांनी हातापायांवर जखमा करून घेतल्या आहेत. जखमा दाखवून ते प्रवाशांकडे भीक मागतात. पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात ते नशा करीत बसलेले दिसतात. प्रवाशांना याचा त्रास होत आहे. अन्य महत्त्वाच्या स्थानकांतही आडोशाला हे नशेबाज दिसतात. याबाबत प्रवाशांनी पोलिसांकडे तक्रारीही केल्या होत्या. पोलिस लवकरच या नशेबाजांवर कारवाई करण्यास सुरुवात करणार आहेत, असे रेल्वे लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सांगितले.

Post Bottom Ad