बेस्टला पालिकेचे ३७.५० कोटींचे अनुदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2014

बेस्टला पालिकेचे ३७.५० कोटींचे अनुदान

मुंबई (प्रतिनिधी) - बेस्टला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी महापालिकेने मंजूर केलेल्या १५० कोटींच्या अनुदानापैकी ३७.५० कोटींचा दुसरा टप्पा नुकताच देण्यात आला आहे. बेस्ट प्रशासनाने गेल्या अर्थसंकल्पात सुचविलेली भाडेवाढ रद्द करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने १५० कोटींचे अनुदान देण्याचे मान्य केले होते. त्याचा दुसरा टप्पा देण्यात येणार आहे.

बेस्टला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी प्रशासनाने २०१३-१४मध्ये भाडेवाढ प्रस्तावित केली होती. ही भोडवाढ रद्द करण्यासाठी महापालिकेने १५० कोटींचे अनुदान देण्याचे मान्य केले होते. स्वतंत्र नागरी परिवहन निधी अंतर्गत अपेक्षित उत्पन्नातील काही भाग देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यातून बेस्ट उपक्रमास अर्थसहाय्य देण्याची तरतूद महापालिकेने केली होती. सशुल्क वाहनतळ योजना रस्त्यावर लावलेल्या जाहिराती फलकातील उत्पन्न तसेच विविध स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न या निधीमध्ये जमा करण्यात आले आहे. केवळ २०१४-१५ या वर्षाकरिता ही सोय करण्यात आली होती. या निधीतून बेस्टला ठरलेल्या अनुदानातील ३७.५० कोटींचा दुसरा टप्पा देण्यात येणार आहे.

Post Bottom Ad