अहमदनगर पाथर्डी जवखेडा येथे एक महिन्या पूर्वी जाधव कुटुंबियांमधिल तिघांचा निर्घुण खून करण्यात आला आहे. एक महिना झाला तरी पोलिसांना अद्याप खून करणाऱ्या आरोपींना पकडण्यात अपयश आले आहे. जाधव कुटुंबियांच्या हत्या करणाऱ्यांना पोलिसांना त्वरित पकडावे या मागणीसाठी राज्यात देशात आणि देशाबाहेर आंबेडकरी जनता एकत्र येवून मोर्चे काढून निदर्शने करत आहे. जाधव कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे.
जाधव कुटुंबियांची हत्या करणाऱ्या लोकांना पकडावे यासाठी गेले महिनाभर मोर्चे काढून निदर्शने करूनही सरकार आणि पोलिसांनी म्हणावे तसे हे प्रकरण हाताळताना दिसलेले नाही. नुकतेच याच ठिकाणच्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्याला एका दुसऱ्या प्रकरणात लाच घेताना पकडण्यात आले आहे. यावरून जाधव कुटुंबियांचे हत्याकांड झाले तेव्हा या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना पूर्ण पाने म्यानेज केले गेले असल्याने आरोपी आजही मोकाट आहेत असे म्हणायला हरकत नाही.
जाधव कुटुंबियांची हत्या झाल्याने जाधव कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून भारिप बहुजन मह्संघाचे प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे रामदास आठवले यांनी २८ नोव्हेंबरला भायखळा येथील जिजामाता उद्यान ( राणी बाग ) ते सिएसटी आझाद मैदान असा मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतू याच दिवशी मुंबईच्या आझाद मैदानात एका मुस्लिम समाजाचा कार्यक्रम असल्याने या मोर्च्यांना परवानगी नाकारली आहे.
पोलिसानी सुरक्षेच्या कारणावरून मोर्चाची परवानगी या आधीही कित्तेक वेळा नाकारली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. म्हणून राज ठाकरे यांनी ना जागा बदलली ना वेळ बदलली आणि परवानगी नसताना मोर्चा काढला. आता पर्यंत पोलिसांनी त्यांना काहीही केलेले नाही. मग आज आंबेडकरी समाजाची माणसे कापली जात असताना त्यांच्या शरीराचे तुकडे पडत असताना पोलिस मोर्चा काढायला परवानगी देत नसतील तर बिना परवानगी मोर्चा काढायला हरकत काय आहे.
मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी नाकारल्या बरोबर प्रकाश आंबेडकर यांनी अजून मोर्चा कसा कधी आणि कुठून निघेल हे अजून जाहीर केलेले नाही. परंतू पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारल्याने आमच्या पक्षाचा मोर्चा २८ नोव्हेंबरला दादरच्या चैत्यभूमी पासून इंदू मिल पर्यंत मोर्चा निघेल असे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. आठवले यांनी असा निर्णय जाहीर करताच आंबेडकरी समजामध्ये आणि राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उत आला आहे.
एखाद्यावर अन्याय अत्याचार झाल्यास त्याला न्याय मिळावा म्हणून किंवा अश्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढणे, न्याय मागणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मुंबई मध्ये मोर्चे आणि न्याय मिळावा अशी एकमेव हक्काची जागा म्हणजे मुंबईचे आझाद मैदान. या ठिकाणी मोर्चे काढून निदर्शने केली जातात. या मोर्चा आणि निदर्शनाचा आवाज सरकार पर्यंत लवकर पोहोचतो. कारण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने मोर्चे आणि निदर्शने केली जावीत आणि सरकारने त्याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे.
यामुळे आझाद मैदान मधील मोर्चाला वेगळे असे महत्व असते. याची सर्व जाणीव असताना आठवले यांनी दादरला चैत्यभूमी ते इंदू मिल पर्यंत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. इंदू मिल मध्ये सरकारचे कोणीही मंत्री बसत नाहीत. आठवले यांनी मोर्चा काढला तरी इंदू मिल पर्यंत सरकारचा कोणतही मंत्री येवून त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारायला येणार नाही. मग आठवले आणि त्यांचे कार्यकर्ते इंदू मिल पर्यंत मोर्चा काढून नुसती स्टंट बाजी करणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रामदास आठवले यांनी आमचे सरकार म्हणजेच शिवसेना भाजप महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर आंबेडकरी जनता आणि मागासवर्गीयांवर होणारे अन्याय अत्याचार कमी होणार नसले तरी अन्याय अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल असे पत्रकार परिषदे मध्ये सांगितले होते. आता सध्या महाराष्ट्र आणि देशा मध्ये रामदास आठवले यांनी समर्थन दिलेले सरकार सत्तेवर आहे. परंतू आठवले यांनी सांगितल्या प्रमाणे काहीही होताना दिसत नाही.
जाधव कुटुंबियांच्या हत्तेला एक महिना झाला तरी अद्याप कोणालाही आठवले यांच्या महायुतीच्या सरकारला पकडता आलेले नाही. आठवले यांचे सरकार जाधव कुटुंबियांना न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. आठवले यांना आंबेडकरी मते मिळवण्यासाठी सोबत ठेवणाऱ्या सरकारने सत्ता मिळताच आठवले यांना किंम्मत देण्याचे बंद केले आहे. म्हणून आपल्या आगे समाजाची ताकद आहे. आंबेडकरी समाजाचा मला किती पाठींबा आहे. हे दाखवण्यासाठी आठवले यांना हा मोर्चा काढावा लागत आहे.
आठवले हे हा मोर्चा काढून एका दगडात तीन पक्षी मारणार आहेत. आंबेडकरी समजाला मी मोर्चा काढला हे दाखवणार आहेत. दुसरीकडे आमच्या पक्षाला महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात सामावून घ्या म्हणून राज्य सरकारवर दाबान निर्माण करणार आहेत आणि तिसऱ्या बाजूला आठवले स्वताची केंद्रातील मंत्रीपदाची जागा फिक्स करून घेणार आहेत. परंतू मोर्चाची परवानगीच नाकारण्यात आली असल्याने आठवले यांची गोची झाली आहे. रामदास आठवले यांना आपलेच सरकार आपल्याला किंमत देत नसल्याने मोर्चा काढावा लागत आहे हीच शोकांतिका आहे.
आठवले यांनी त्यांचेच सरकार केंद्रात आणि राज्यात असल्याने मोर्चे काढण्याची स्टंट बाजी करण्यापेक्षा आंबेडकरी समाजाला न्याय मिळवून द्यायला हवा होता. परंतू स्वताचे सरकार असताना आठवले यांना आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून देता आलेला नाही. हे आठवले यांच्या समर्थनावर राज्य करणाऱ्या सरकारचे आणि आठवले यांचे अपयश आहे. आठवले यांच्यासांगण्यामुळे भाजपाला मते देणाऱ्या आंबेडकरी मतदारांना आणि आठवले यांच्या कार्यकर्त्यांना हि जोरदार चपराक आहे असेच म्हणावे लागेल.
रामदास आठवले यांना खरोखरच हा मोर्चा काढायचा असल्यास आणि आंबेडकरी अन्याय अत्याचार झालेल्या जनतेला न्याय मिळावा वाटत असल्यास हा मोर्चा त्यांनी आझाद मैदानातच काढावा. याच आझाद मैदानात भारिप बहुजन मह्संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचाही मोर्चा त्याच दिवशी निघणार होता. त्यालाही पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांनी पोलिसांची तमा न बाळगता याच आझाद मैदानात मोर्चा काढावा. हवे असल्यास एखादा दिवस मागे पुढे करावा पण मोर्चा आझाद मैदानात काढून आंबेडकरी जनतेची ताकद सरकारला दाखवून द्यावी अशी मागणी आंबेडकरी समाजातून होत आहे.
आंबेडकरी आणि मागासवर्गीय जनतेवर अन्याय अत्याचार वाढत आहेत. मागासवर्गीयांच्या हिताच्या विरोधातील सरकार सत्तेवर आले आहे. निदान अश्या वेळी तरी प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या सारख्या नेत्यांनी समजाच्या हिता साठी एकत्र यायलाच हवे. समाजावर अन्याय अत्याचार होत असताना जर हे दोन्ही नेते एकत्र येवू शकत नसतील तर हि आंबेडकरी जनतेसाठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. आंबेडकरी समाज एकत्र येत असल्यास प्रा. जोगेंद्र यांनी आपण एकत्र येण्यास तयार आहोत असे म्हटले आहे. तेव्हा सर्व नेत्यांनी एकत्र येवून अन्याय अत्याचारा विरोधात एकत्र आवाज उचलायलाच हवा.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment