नगरसेवक विनोद शेलार यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2014

नगरसेवक विनोद शेलार यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

मुंबई - भाजपचे वॉर्ड क्रमांक ४१चे नगरसेवक विनोद शेलार यांच्याविरुद्ध एका महिला विकासकाच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालाड पूर्वेकडील नाडियारवाला कंपाऊंडमध्ये पुनर्विकासाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प एका महिला विकासकाकडे आहे. या महिलेची परवानगी न घेता विनोद शेलार यांनी जबरदस्तीने या जागेतून ड्रेनेज लाइन टाकली. त्यानंतर या महिलेने जुलै महिन्यात पोलिसांत लेखी तक्रार केली. प्राथमिक चौकशीनंतर विनोद शेलार आणि दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित सुर्वे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात आपल्याला नाहक गोवल्याचे विनोद शेलार यांचे म्हणणे आहे. ती महिला खोटे बोलत असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे शेलार यांनी सांगितले.

Post Bottom Ad